________________
(२४७)
लोभी व्यक्ती धनाला कल्याणाचे साधन मानतो. तो विसरतो हे अर्थच अनर्थाचे आहे. हा लोभ माणसात केव्हा प्रवेश करतो हे समजतच नाही. माणूस वृद्ध झाला ती लोभ सुटत नाही. लोभी उदार कधीच नसतो. तो स्वतःही उपभोग घेत नाही व परिवाराला पण सुख देऊ शकत नाही. लोभी माणसाचा एकच सिद्धान्त “चमडी जाय पर मंडी न जाय । १९०८ लोभी अनीतीलाच नीती मानतो..
विश्वातील सर्व संपत्ती आणि वैभव प्राप्त झाले तरी लोभीच्या चित्तात समाधान नसते. शांती नसते. माणसाचे जीवन संपते पण तृष्णा कधीच संपत नाही. बंध आणि सीम यासाठी दोन गोष्ट महत्त्वपूर्ण आहेत- 'मम' आणि 'निर्मम मम म्हणजे लोभ व निर्मम म्हणजे संतोषी वृत्ती निर्मम' म्हणजे "हे माझे नाही" अशा भावनेमुळे मनुष्य बंधनातून मुक्त होतो.
सिंह जहा व कुणिमेणं णिभयमेगवरं पासेणं १०९
सिंहसारखा निर्भय प्राणी, एकटा राहणारा पण मांसाच्या लोभाने शिकाऱ्याचे सावज बनतो. त्याचप्रमाणे मनुष्य लोभाने कर्माच्या बंधनात अडकतो.
जहा लाहो तहा लोहो, लाहा लोहो पवड्ढई ।
दो मास कयं कज्जं, कोडिए न निट्ठियं ॥ ११०
जस-जसा लाभ होत जातो, तस-तसा लोभ वाढत जातो. अशा प्रकारे लाभ होत गेला की लोभ वाढतच जातो. दोन मासे सोन्याने संतुष्ट होणारा कपिल करोडो सुवर्ण मुद्रांनी पण संतुष्ट होऊ शकला नाही. ऋषिभाषित उल्लेख आहे- बाहेर जळणाऱ्या अग्नीला थोड्याशा पाण्याने शान्त केले जाऊ शकते. पण अंतरात जी मोह, तृष्णारूपी अग्नी जळते तिला संपूर्ण समुद्राभर पाण्याने शान्त केले जाऊ शकत नाही. १११ झाला तरी वासना, तृष्णा, लोभ कधीच वृद्ध होत नहीत.
मनुष्य शरीराने
वृद्ध
ज्ञान सारमध्ये लिहिले आहे.
भूशय्या भेक्ष्यमशनं जीर्णवासो वनं गृहम् ।
तथापि निःस्पृहस्याहो ! चक्रिणोप्यधिकं सुखं ||११२
भूमीवर शयन करतात. भिक्षा मागतात. जीर्ण झालेले कपडे परिधान करतात.
वनात राहतात असे मनुष्य चक्रवर्तीपेक्षा ही अधिक सुखी आहे.
लोभाचे वर्णन करताना ऐतरेय अरण्यकमध्ये लिहिले आहे
लोभी मनुष्य