________________
(२५४)
(३) संक्लिष्ट आणि २) असंक्लिष्ट १२३
साधकाने संक्लिष्ट भावनेचा परित्याग करून असंक्लिष्ट भावनेचा अभ्यास केला जो पापात्मक, आत्मक्लेशप्रद भावनेने युक्त असतो त्याला 'संक्लिष्ट' म्हणतात. याचे तात्पर्य 'अशुभ किंवा अप्रशस्त भावना' आहे. या भावनेमध्ये संक्लेशपूर्ण, जन्मउत्तापयुक्त चिंतन सतत चालत राहते. त्यामुळे ही संक्लिष्ट भावना आत्म्याच्या नाला कारणीभूत आहे. असंक्लिष्ट भावना आत्म्याच्या शुभात्मक प्रवृत्तीने युक्त असते. आत्मपरिणाम तीन प्रकारचे मानले आहे- अशुभोपयोग, शुभोपयोग आणि शुद्धोपयोग. अशुभोपयोग पापबंधाचे कारण आहे.
शुभोपयोग पुण्यात्मक बंधाचे कारण आहे.
शुद्धापयोग पापकर्मापासून विवर्जित आत्मोत्कर्षाचा भाव आहे.
असंक्लिष्ट भावना आत्म्याला शुद्धोपयोगाकडे जाण्यास प्रेरित करते. साधनामार्गावर पुढे जाणारा आत्मा शुभापासून शुद्धाकडे गतिशील होतो. हेच त्याचे परम लक्ष्य आहे. बृहत्कल्पभाष्यामध्ये संक्लिष्ट अप्रशस्त भावनेचे १) कांदर्पी २) देवकिल्विषी ३) अभियोगी ४) आसुरी ५) संमोही असे पाच प्रकार आणि त्या प्रत्येकभावनेचे पाचपाच उपभेद केले आहेत. १२४
-
उत्तराध्ययन सूत्राच्या 'जीवाजीव विभक्ती' नामक अध्ययनामध्ये ह्या पाच भावनांचा उल्लेख झाला आहे. ह्याचे पूर्वीच तिसऱ्या प्रकरणात विवेचन केलेले आहे. उत्तराध्ययन सूत्र आणि भाष्यामध्ये दोन्ही ठिकाणी पहिल्या भावनेचे नाव 'कांदर्पी' बृहत्कल्प • आहे. दोन्हींचे तात्पर्य जवळजवळ एकसारखेच आहे. येथे पाच संक्लिष्ट भावनेच्या भेद प्रभेदाचे विवेचन केले आहे.
कांदर्पी भावना
ज्यांच्यामध्ये अत्याधिक कामवासना असते त्या कामप्रधान देवांना 'कंदर्प' म्हटले जाते. त्यांचे मन सदैव कामवासनेच्या चिंतनात गढलेले असते. अशाप्रकारच्या भावनेला
'कांदर्पी भावना' म्हणतात.
कांदर्पी भावनेचे प्रकार
१) कंदर्प २) कौत्कुच्य ३) द्रवशीलता ४) हासकारिता ५) परविस्मायकता ही पाच रूपे आहेत.१२५