________________
(२५३)
मुक्त होऊन शुभ व शुद्ध तत्त्वांची प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करावा. शुभ तत्त्वांचा जीवनात उत्तरोतर विकास करण्यासाठी वेगवेगळ्या साधनापद्धती प्रत्येक धर्मात सांगितलेल्या
आहेत.
आजच्या युगाची जी स्थिती आपण पहात आहोत त्यात बाह्य आडंबर, क्रियाकांड, उत्सव या व अशा अनेक गोष्टी बाह्य जगात गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. साधना मार्गातील हे अडसर आहेत. ह्या संसारातील आकर्षण असल्यामुळे माणूस • चिखलात फसल्याप्रमाणे त्यात अडकून पडतो. अशा या भौतिक जगाचा मोह खेचणारा असला तरी याही परिस्थितीत असेही जीवात्मा आहेत जे आत्मकल्याण साधना करून मनुष्य जन्माचे सार्थकही करीत आहेत.
मनुष्य मूळात सात्त्विक प्रवृत्तीचा आहे पण कर्मावरणामुळे त्याची प्रवृत्ती झाकली गेली आहे. आपले मूळ गुण सुरक्षित ठेवण्यासाठी अशुभ भावनेपासून मुक्त व्हायला पाहिजे. माणसाच्या स्वभावाची एक विशेषता अशी आहे की सोपे, सरळ सहजसाध्य गुण अंगिकार गोष्टी तो पटकन स्वीकारतो. अवगुणांचा स्वीकार पटकन होतो, त्याप्रमाणे करण्यास मात्र प्रयत्न करावे लागतात. अवगुणांचे अनुकरण करण्यासाठी प्रयत्नच करावा लागत नाही. यापासून दूर राहण्यासाठी प्रथम शुभ म्हणजे चांगले काय व अशुभ म्हणजे बाईट काय याची समज असायला पाहिजे. जोपर्यंत हे समजणार नाही तोपर्यंत पुण्यपाप काय व कशात आहे हेही समजणार नाही. अशुभ भावनेतच जीवनातील सगळा वेळ व्यर्थ जाईल.
जेव्हा जेव्हा मनुष्य अशुभ भाव चिंतनात असतो तेव्हा त्याची स्थिती अघोगतीकडे जाणारी असते. इतकेच काय अगदी कोणी महान तपस्वी, योगी असला व त्याची मानसिकता अशुभ चिंतनाची असेल तर तो नरकात जाऊ शकतो. म्हणून महान आचार्यांनी, जे आगमोत्तर काळात होऊन गेले, त्यांनी अशुभभावनेचे स्वरूप समजावून सांगितले व त्याचा त्याग करावा हे ही सांगितले आहे. हिंसा इत्यादी पाच आणि क्रोधमान इत्यादी चार अशा नऊ अशुभ भावनेचे विवेचन पाहिल्यानंतर कांदर्पि इत्यादि अशुभ
भावनेचे वर्णन बृहत्कल्प भाष्यात प्राप्त होते ते पाहू:
बृहत्कल्प भाष्याच्या संस्कृत वृत्तीचा प्रारंभ आचार्य श्री मलयगिरी सूरींनी केला होता आणि संपूर्ती आचार्य श्री क्षेमाकिर्ती यांनी केली होती. त्या बृहत्कल्पसूत्रात भावनाविषयक चर्चा प्राप्त होते तेथे सांगितले आहे की भावना दोन प्रकारच्या आहेत