________________
(२४९)
या सर्वांना लोभ नष्ट करतो. आणि आत्म्याचे वास्तविक जे स्थान मोक्ष आहे त्यापासून आपणाला दूर फेकून देतो.
लोभी धनाच्या लोभापायी आपला स्वदेश सोडतो, श्रेष्ठ दानधर्म त्यागतो, आपल्या स्वजनांना सोडून हिंस्त्र पशूच्या निवासस्थानात परिभ्रमण करतो. मगरमच्छाने भरलेल्या
मण करतो. धर्मरहित म्लेंच्छादिच्या देशात भ्रमण करतो. यामागचे एकच कारण
अतिलोभ.
लोभाच्या वशीभूत होऊन कुलहीनांची सेवा करतो. लोभामुळे अधमाधम कार्य करण्यास प्रवृत्त होतो. दुष्टजनांची स्तुती करतो. पाखंडी, मूर्ख, कुसाधुंना वश करतो. स्वभावाने विचित्र बनतो. आपल्या कुलाची, जातीची लाज सोडून फक्त धन मिळविण्याच्या प्रयत्नात मग्न राहतो. धनाच्या लोभाने कोणतेही दुष्कृत्य करण्यास तो सदैव तत्पर राहतो.
लोभी आपल्या पापामुळे स्वतःही कोणताही सुखोपभोग घेत नाही व इतरांनाही घेऊ देत नाही. लोभी आपल्या घरी मेवा-मिष्टान्न खाणार नाही पण इतरांच्याकडे मात्र त्यावर चांगला ताव मारतो. पशू तरी बरा अशी त्याची वृत्ती बनते.
लोभी मनुष्य तीव्र लोभामुळे चांगल्या वस्तूंमध्ये कचरा मिसळून विकतो. खरेदी करताना जास्त घेतो, विकताना मात्र कमी वजन करतो.
संसारात परिभ्रमण होते ते या लोभामुळे. तरी ही त्याचा त्याग करावा, सरळ वृत्ती ठेवावी याचे त्याला भान रहात नाही. त्यामुळे चौऱ्यांशी लक्ष योनीत सतत जन्ममरणाच्या फेऱ्या करीतच राहतो.११५ ___ लोभापासून परावृत्त व्हायचे असेल तर असा विचार करावा की, जेवढे आपल्या प्रारब्धात असेल तेवढे आपल्याला मिळणारच. त्यापेक्षा जास्त मिळणारच नाही. मग जास्त मिळविण्याचा खटाटोपात कर्मबंध कशाला करावे. आणि जिथे संपत्ती जास्त तिथे दुःखे ही जास्तच. म्हणूनच म्हटले आहे - जेथे "संपत्ती तेथे विपत्ती"
लोभाच्या विरुद्ध संतोष. ज्या व्यक्तीमध्ये संतोषी वृत्ती आहे तो देवापेक्षाही आधिक सुखी आहे. असा विचार करून जे मिळाले आहे त्यावरसुद्धा ममत्व न ठेवता निलोभी, निर्ममत्वी भावनेने रहावे तर सर्व इच्छित वस्तूसुद्धा आपोआप मिळत राहतातसताषः परमं पथ्यम्' तृष्णारूपी रोगापासून सुटका करण्यासाठी संतोष सर्व श्रेष्ठ पथ्य
आहे.