________________
(२३९)
नी आहे. आणि मीच अतिशय पुण्यवान आहे. माझ्यासारखा सर्वगुण संपन्न कोणीच
विचारामुळे दुसऱ्या धर्मात्म्यांचा तो तिरस्कार करतो. म्हणून ही भावना पापमय
नाही, अशा
अशुभ भावना आहे. अशा भावनेमुळे मनुष्य संसारात परिभ्रमणच करीत राहतो.
मान कषायामुळे मनुष्य जे काही सत्कृत्य करतो, दान, जप, तप सर्व नष्ट
होते.
अभिमानी मनुष्य संसारात संताप, पाखंड व मिथ्यात्व समुहाला वाढवतो व मोक्ष मार्गाला दुरावतो. साधार्मिकांची निंदा करतो. अभिमानी आपले हित साधू शकत
नाही ९१
पुढील श्लोकात कवी कुंधुसागरजी फारच व्यंग्यात्मक भाषेत लिहितात की अभिमान केल्याने पूर्वी कधीही झाला नाही असा लाभ मिळतो की त्याचे दारिद्र्य कधीच संपत नाही. आपले आत्मिक धन आणि आत्मिक स्वराज्य गमावतो. दुर्भाग्याला आमंत्रण देतो. अभिमानाचे हेच फायदे आहेत.
परंतु अभिमान केल्याने काही फायदा होतो असे आतापर्यंत कधीही घडले नाही. घडणार नाही. अभिमानाने कुळाचा, वंशाचा नाशच झाला आहे. म्हणून सुखेच्छू मानवाने कधीही अभिमान करू नये.
अभिमानामुळे शुद्धभावना नष्ट होते. मोक्ष मार्गाचा अवरोध होता. आत्मजन्य आनंदाचे मूळ कारण जो धर्म त्यालाही मुकतो. निंदनीय कर्म ग्रहण करतो. अभिमानी पुरुष अभिमानामुळे तुच्छ बनतो. आत्मज्ञानाने शून्य होतो. विचारहीन होतो. आणि निश्चितपणे पुण्यहीन होतो.
अभिमानी माणसापासून स्वजनही दूर राहतात. आणि अभिमानी स्वतःच दुःख ओढवून घेतो. आचारापासून परावृत्त होतो. त्याच्या सुख शांतीचा नाश होतो. महामुश्किलीने प्राप्त केलेल्या अमूल्य पुण्यरूपी धनाचा नाश करतो.
अभिमानी पुरुष जे गुण आपल्या स्वतःमध्ये नाहीत ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. इतरांमध्ये असलेले गुण झाकण्याचा प्रयत्न करतो. गरीब, दरिद्री, हीन-दीन लोकांना पाहून स्वतः सुखी असण्याचा अभिमान करतो.
अभिमानी पुरुष आपल्या अभिमानाच्या आवेशात चिन्तामणी, कल्पवृक्ष आणि कामधेनू सारखे इच्छित सुख देणारे आणि स्वर्ग व मोक्षाचे मूळ कारण अशा जैनधर्माच्या