________________
(२१० )
न्यासाचे अपहरण करणे, म्हणजे दुसऱ्याचे विश्वासाने
४) न्यासापहार
आपल्याकडे ठेवलेली वस्तू हडपण्याचा प्रयत्न करणे.
५) खोटी साक्षी
सत्याला असत्य व असत्याला सत्य शाबित करणे ३३
- न्यायालयात पंचायतीत स्वार्थवश खोटी साक्ष देणे,
मंदिरावरच्या ध्वजाप्रमाणे व गाडीच्या चाकाप्रमाणे सतत आपले वचन बदलणारे लोक दुःखमय जीवन प्राप्त करतात. कारण मनुष्याच्या वाणीवरूनच त्याची किंमत होते.
ना नर गज न ना पिये, ना नर लिजे तोल ।
संत कहे नर, नार का, बोल बोल में मोल ॥
सत्याचा महिमा वाणीतच आहे.
असत्वाने जीवनव्यवहार अशुद्ध बनतो. असत्य आचरण करणाऱ्याचे पूजापाठही लांछनरूप/कलंकरूप बनतात. ३४
'नानृतात् पातकं परम्' परम्' ३५ खोटे बोलण्यासारखे दुसरे कोणतेही पाप नाही. मौन ठेवणे चांगले परंतु असत्य बोलणे चांगले नाही. कारण त्यामुळे दुसऱ्या पापाची निर्जरा होते. परंतु असत्याचे फळ भोगावेच लागते. बहिरेपणा आणि तोंडाचे अन्य रोग असत्य बोलण्यानेच होतात.
ज्यांना असत्य बोलण्याची सवय असते त्यांना कोणतेही अयोग्य कर्म करण्याची लाज वाटत नाही.
जन्मापासूनच मनुष्याच्या तोंडात जीभरूपी तलवार असते. अज्ञानी त्याचा उपयोग दुर्वचन बोलून स्वनाश करण्यासाठी करतो, तर ज्ञानी त्याचा उपयोग परोपकार, प्रभुस्मरण करून कर्मबंध तोडण्यासाठी करतो.
जो सत्य बोलतो त्याची यश, कीर्ती वाढते. सज्जनलोकात त्याची प्रशंसा होते. उभयलोकी तो सुखी होतो. म्हणून संयममय, विवेकयुक्त अशी भाषा बोलली पाहिजे. स्तेयानुबंधी भावना
स्तेय म्हणजे चोरी करणे. अधिकाराची वस्तू दुसऱ्याच्या वस्तू त्याची इच्छा भावना आणि आज्ञेशिवाय आपल्या अधिकारात करणे हे चौर्य कर्म आहे.
स्तेय अथवा चौर्य कर्म वस्तू किंवा पदार्थांच्या ओढाताणीतच सीमित नाही तर कोणाच्याही अधिकाराला जबरदस्तीने घेणे, कोणाच्याही विचारांना अथवा साहित्य किंवा