________________
(२१६)
मित्र शत्रू बनतात. प्रेम नष्ट होते. चोरीमुळे महाभयंकर नरसंहारही होऊ शकतो. भांडणे होतात. संयमाचा नाश होतो. अशा मनुप्यावरील विश्वास नष्ट होतो. कलंकित होतो.
स्तेय कर्म व स्तेयभावना यामुळे माणसाचे वर्तमान जीवन दुःखमय बनते व भावी जीवन दुःखमय बनते. जन्ममरण रूपी संसाराची वृद्धी होते.
निसर्गदत्त वस्तू हवा, पाणी, माती इ. ज्या सर्वांसाठी आहेत. त्याचा वापर करण्यास विरोध नाही किंवा तो चोरी म्हणता येणार नाही. ज्या वस्तूचा कोणी स्वामी नाही. अथवा एखाद्याने एखादी वस्तू सर्वांसाठी उपयोगी व्हावी म्हणून ठेवली असेल तर ती ग्रहण करण्यात व्यवहाराच्या दृष्टीने चोरी नाही. गृहस्थ अशा वस्तूंचा उपयोग करू शकतो पण साधू अशा वस्तूंचाही स्वीकार करीत नाहीत. त्यांना शकेन्द्राची आज्ञा घ्यावी लागते.
चोरीच्या पापापासून आपल्याला दूर रहायचे असेल. आपले जीवन सुखी, शांततेने जगायचे असेल तर जे काही आपल्याला मिळाले आहे. त्यात संतोष मानून आनंदाने रहावे. "संतोषी नर सदा सुखी" ह्या उक्तीप्रमाणे आपण आपले जीवन जगावे. दुसऱ्यांच्या वस्तूकडे अघाशीपणाने न पाहता किंवा ती मिळविण्यासाठी 'चोरी' सारखे हीन तुच्छ विचार मनात सुद्धा येता कामा नये.
मैथुन संबंधी भावना
मिथुनभाव अथवा मिथुन कर्माला मैथुन म्हणतात. याचेच नाव 'अब्रह्म.'
युगल म्हणजे मिथुन - स्त्री-पुरुष यांना युगल म्हणतात. दोघांच्या संभोगभाव यास मैथुन म्हणतात. ४२
अब्रह्मचर्य अथवा मैथुन ही अशी भावना आहे की ती मानवासकट सर्व प्राण्यांमध्ये दिसते. ही भावना म्हणजे दलदल आहे. यात प्राणी गुंतला की तो त्यात घसरतच जातो. मैथुन ही बेडी आहे जी संसारात प्राण्याला गुंतवून ठेवते.
हा मायाजाल आहे. स्त्रीवेद, पुरुषवेद, नपुंसकवेद असे याचे तीन चिह्न आहेत. मैथुन ब्रह्मचर्याचा घात करणारा आहे.
तप, संयमासाठी विघ्नरूप आहे. सम्यक्चारित्राचा विनाश करणारा आहे. म्हणून साधकाला ते त्याज्य आहे.
यामुळे जीव जरा, मरण, रोग, शोक यास प्राप्त होतो. याचे मूळ कारण