________________
(२१७)
नमोहनीय आणि चारित्रमोहनीय आहे. हे दूर करण्यासाठी तीव्र मनोबल, दृढसंकल्प, तप इ. साधना करायला पाहिजे. साधकाने या मार्गाचा अवलंब घेतला पाहिजे.
मैथुन भावना निर्माण होताच त्याचे दुष्परिणाम किती भयंकर आहेत याचे चिंतन करावे. अब्रह्म हे अशुभ आचरण आहे. हे मानसिक संकल्पामुळे उत्पन्न होणारे पाप आहे. त्यामुळे आत्मिक गुणांचा घात होतो. संयम इ. सदगुण नष्ट होतात. शील घातक असल्यामुळे सदाचाराचा विरोधी आहे.
मानवाच्या मनात जेव्हा तीव्र मैथुन भाव येतात तेव्हा त्याची सदबुद्धी नाश पावते. सदसद्विवेक, कर्तव्य, अकर्तव्य याचे भान रहात नाही. आपले हित अहिताचा भविष्यात होणाऱ्या दुष्परिणामाचा विसर पडतो. सम्यग् विचार करू शकत नाही. म्हणूनच अशा प्रवृत्तीस विषयांध प्रवृत्ती म्हटले जाते. अशावेळी तो आपल्या यश, कुल, शील इ. चा थोडा सुद्धा विचार करीत नाही. ४३
पूर्वीच्या काळी आपापसात जे भयंकर युद्ध झाले, अतोनात मनुष्यहानी झाली, त्याचे मूळ कारण मैथुनच होते.
वास्तविक मैथुन संबंधी भावना अत्यंत हीन आहे. यामुळे आत्मा मलीन होतो. आजचे जीवन तर रसातळास जातेच पण भविष्य सुद्धा अत्यंत दुःखमय होते.
अब्रह्मरूप अधर्माने सुख अत्यंत कमी पण भयंकर दुःख देणारा आहे. याचे फळ भयंकर आहे आणि पापयुक्त आहे. ४४
ब्रह्मचर्य जीवनाचे पोषक तत्त्व आहे. अब्रह्मचर्याने मानसिक व शारीरिक दोन्ही शक्तींचा -हास होतो.
अब्रह्म म्हणजेच सद्गुणांचा -हास आणि दोषांचे पोषण होय. ४५ ही प्रवृत्ती दोषांचे पोषण करणारी आहे.
म्हणूनं मैथुनाचे दुष्परिणाम किती आहेत हे जाणावे व मनावर संयम ठेवावा. मैथुन भावनेसंबंधी चिंतन केल्याने मनुष्य त्या विषयात आसक्त होतो. जसा खिडकीतून चोर आत घुसतो तसे मनाच्या दाराने विषय विकार आत येतात. म्हणून विषयासंबंधी विचारात मन गुंतू न देता नामस्मरणात जोडावे.
पुष्कळवेळा मनुष्य विषपान केल्याने जगू शकतो पण खाल्लेल्या विषाचा विचार केल्याने मरू शकतो. तसेच मैथुन सेवन न करता ही त्या विचाराने भावनेने आत्म्याचे पतन होते.