________________
(२२६)
सवा
६७ आनंद श्रावक आपल्या इच्छेचा परिमाण करीत आहे. सर्व प्रथम माणसाच्या मनात वस्तू प्राप्त करण्याची इच्छा जागृत होते. संकल्प
तर ती प्राप्त करण्यासाठी अथक प्रयत्न सुरू होतात. याचा अर्थ जर इच्छाच
धावपळ करण्याची आवश्यकताच नाही. आणि संग्रह करण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. म्हणजे इच्छाच सर्वात मोठा परिग्रह आहे.
माछन्नधियां सर्व, जगदेव परिग्रहः ।
मर्छया रहितानां तु, जगदेवा परिग्रहः । अर्थात् - ज्यांची मनोभावना आसक्तीने ग्रासलेली आहे, अशांच्या दृष्टीने तर पर्ण संसारच परिग्रहमय आहे. परंतु जो मूर्छा, आसक्ती ममत्वपासून दूर आहे. या तिन्ही ज्याच्या मनात नाही त्याच्यासाठी संपूर्ण संसार त्याच्याजवळ असला तरी त्याला परिग्रह शिवतसुद्धा नाही. तो परिग्रही नाही.
__ म्हणून परिग्रहानुबंधी भावनेत परिग्रह संग्रहित करण्याची जेव्हा इच्छा निर्माण होते, तेव्हा असे चिंतन करावे की या इच्छा कधीच तृप्त होत नाही. म्हणून इच्छांचा त्याग करण्याचे चिंतन करावे. अपरिग्रही, अनासक्त भावनेचे चिंतन करावे.
आपल्या जवळ जे काही आहे, त्यावरील आसक्ती कमी केली तर परिग्रह ही कमी होईल. परिग्रह असतानासुद्धा अपरिग्रही राहण्याची किमया जमली तर ती मोठी कला अवगत झाल्यासारखे होईल. या कलेला हस्तगत करण्यासाठी परिग्रहामुळे जे दुष्परिणाम होतात त्याचे चिंतन करावे.
निष्परिग्रही, ममत्वरहित जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. जो या कलेमध्ये निपुण होईल तो संसारात कोणत्याही अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीत हर्ष-शोक करणार नाही. त्याच्याजवळ लाखो-करोडोंची संपत्ती आली काय किंवा गेली काय, परिवार वाढला काय किंवा नष्ट झाला काय, कितीही उलथापालथ झाली तरी तो प्रत्येक वेळी मनाचा समतोल ढळू देणार नाही. सुखात अतिआनंदी आणि दुःखात अतिदुःखी होणार नाही. ही समत्वाची साधना केल्यानेच प्राप्त होते.
अनासक्त भावना जोपासली तर तृष्णा रोग लागू पडणार नाही. त्याच्या अंतहृदयापर्यंत न दुःख शिरकाव करू शकेल न सुख.