________________
(२२९)
का अप्रत्याख्यानी कषायाने युक्त श्रावक व्रतांना ग्रहण करू शकत नाही. आणि
च गतीमध्ये जातो. याचा परिणाम एक वर्षापर्यंत राहतो. ह्याच्या उदयाने
।
सकामनिर्जरा होत नाही.
२) प्रत्याख्यानावरण क्रोध - माती किंवा वाळूत रेघ काढण्यासारखे जी हवेमुळे या अन्य कशाने लेगच पुसली जाते.
१०) प्रत्याख्यानावरण मान - काठ, स्तंभासारखे.
११) प्रत्याख्यानावरण माया - रस्त्याने चालताना बैलाच्या मूत्राचे वाकडे तिकडे व्रण उठतात तसे.
१२) प्रत्याख्यानावरण लोभ - चिखल मातीच्या रंगासारखी स्थिती असणारा.
या कषायांची स्थिती ज्यास्तीत जास्त चार महिनेपर्यंत असते. असे साधू व्रत ग्रहण करू शकत नाही. मृत्यूनंतर मनुष्य गतीत जातात.
१३) संज्वलन क्रोध - पाण्यात काढलेल्या रेघेप्रमाणे. १४) संज्वलन मान - वेल किंवा तृण समूहाप्रमाणे. १५) संज्वलन माया - बांबूच्या सालीप्रमाणे. १६) संज्वलन लोभ - पतंगाच्या रंगाप्रमाणे अथवा हळदीच्या रंगाप्रमाणे
या कषायांचा परिणाम जास्तीत जास्त पंधरा दिवसापर्यंत राहातो. आणि तो यथाख्यात चारित्र व केवलज्ञान. केवलदर्शन प्राप्त करू शकत नाही.
१७) हास्य - हसणे, चेष्टा, मस्करी करण्याचा स्वभाव. १८) रति - अकार्यात आसक्ती. १९) अरति - धर्मकार्यात अरुची. २०) भय - कोणतेही काम करण्यात भीती वाटत राहणे. २१) शोक - प्रतिकूल संयोगात चिंता करणे, दुःखी होणे. २२) दुगंछा - घृणा, तिरस्कार, दुर्गध इ. ने बेचैन होणे. २३) स्त्रीवेद - पुरुषाबरोबर मैथुनभावना. २४) पुरुषवेद - स्त्रीशी मैथुनभावना. २५) नपुंसकवेद - स्त्री व पुरुष दोघांशी मैथुनभावना.