________________
(२३२)
क्रोधामुळे शारीरिक सौंदर्याचा, सौम्यतेचा नाश होतो. क्रोधामध्ये चेहरा विकृत उनले लाल-लाल होतात. क्रोधाचा अत्यंत भयानक परिणाम म्हणजे वैरभावनेने भांडणे
होतात. कुलाचा नाश करणारे हे शस्त्र आहे. मातीचा कुंभ एकदा फुटला की फुटलाच. मत जोडता येत नाही. त्याचप्रमाणे एकदा वैर निर्माण झाले की ते शांत होत नाही.७८
"क्रोधः संसार बंधनम्" क्रोध संसारात बांधून ठेवणारा आहे. म्हणजे क्रोधी माणूस सारातून, भवभ्रमणातून मुक्त होऊच शकत नाही. त्याला मोक्षाची प्राप्ती होत नाही.
"क्रोधः शम सुखार्गला ।'' क्रोध, शांती आणि सुख प्राप्तीमध्ये अडथळा निर्माण करतो कर्मबंधन होते.
"क्रोधः पुनः क्षयते क्षणेनापि पूर्व कोट्यार्जित तपः'
क्रोध हा पूर्व संचित केलेल्या करोडोपूर्व तपाच्या लाभाचा क्षणात नाश करणारा आहे.
- आपण म्हणतो, जो आपल्यावर अपकार करतो त्याच्यावर क्रोध येणारच. असे आहे तर आपल्या आत्म्याचा अपकार करणारा हा क्रोध आहे. त्या क्रोधावरच आपल्याला क्रोध करायला हवा.७९
___ ज्याच्या मनात क्रोधरूपी दुर्गुण प्रवेश करतो, त्याच्यात मैत्री, प्रमोद करुणा, कृपा कीर्ती, धैर्य, विद्या, व्रत, उपवास आणि आत्मचिंतन हे जे आत्मिक गुण आहेत त्यांचा नाश होतो.
साप मणीयुक्त असला तरी त्याला कोणी पाळीत नाही. वाघ, सिंह शक्तीशाली असले तरी लोक त्याच्यापासून दूरच राहतात. त्याचप्रमाणे क्रोधी व्यक्ती कितीही गुणवान असली तरी त्याच्याशी कोणी मैत्री करीत नाही. साप, विंचू यांची कोणी सेवा करीत नाही, त्याप्रमाणे क्रोधी माणसाची कोणी संगत ठेवीत नाही. आदर, सत्कार तर त्याला
मिळतच नाही.
क्रोधी माणसाने कितीही जप, तप, व्रत-उपवास इ. केले तरी त्या सर्व क्रिया
निष्फळ आहेत.
क्रोधी स्वतःचे हित तर करीत नाहीच. इतरांचे ही नाही. त्याला पूण्य काय पाप काय हे ही समजत नाही. ज्याप्रमाणे अग्नी लाकडाला, गवताला जाळूप भस्म करते, ज्याप्रमाणे माकड फळाफुलांनी बहरलेल्या बागेला नष्ट करतो, लोभी राजा आपल्या राज्याला
daltakepsinginapagsutva-
gmain-naduInnonein
Rasaitanicationalitimathain