________________
(२३१)
क्रोधानुबंधी भावना
चार कषायांपैकी क्रोधाचे स्थान प्रथम क्रमांकाचे आहे. क्रोध चार कारणाने उत्पन्न होतो १) क्षेत्र निमित्ताने २) वस्तूच्या निमित्ताने ३) शरीर निमित्त ४) उपाधी
निमित्त ७३
क्रोधामुळे संताप होतो. सर्व इंद्रिया उत्तेजित होतात, उद्वेग होतो. शत्रुत्व वाढते, सुगतीचा नाश होतो. हे सर्व केवळ क्रोधामुळे आपापसातील स्नेह नष्ट करणारा क्रोधच
आहे.
क्रोधाच्या आवेगात धर्म-कर्म सर्व नाश पावतात. धर्मविमुख बनतो व दुर्गतीचा अतिथी बनतो.
चारित्र्यमोहनीय कर्माच्या उदयामुळे क्रोध उत्पन्न होतो. क्रोध आला की विवेकबुद्धी, सदसद्विवेकबुद्धी नष्ट होते. क्रोधात माणूस वेडेचाळे करतो. तो काय बोलतो हे त्याचे त्यालाच कळत नाही.
क्रोधी मनुष्य क्रोधाच्या आवेशात वाटेल ते बरळतो. अकार्य अवाच्य याचे त्याला भान रहात नाही. क्रोधाच्या उन्मादात तो काय करील याचा नेम नाही. ७४
क्रोधो वच्चति धूमो - क्रोध मनाचा धूर आहे.
क्रोधरूपी अनी जीवन रसाला जाळून टाकते.
वाळलेल्या गवताला लाकडाला लागलेल्या अग्नीप्रमाणे त्याचा क्रोध वाढत जातो. त्याच्या यशाला ओहोटी लागते. कृष्णपक्षात चंद्र जसा कलेकलेने कमी होतो त्याप्रमाणे ७५ क्रोधी मनुष्य व राक्षस या दोघांच्या वृत्ती सारख्याच नरकातील लोकांसारखे त्याचे बागणे होते.७६
to heat
रौद्ररूप त्याचे होते. म्हणून शास्त्रकार म्हणतात. "अप्पाणं पि न कोवए ७७ आपल्या स्वतःवर सुद्धा कधी क्रोध करू नये. स्वतःवर क्रोध करणे म्हणजे आत्मघात करण्यासारखे आहे.
क्रोधाची चिह्ने चेहऱ्यावर दिसतात. म्हणून क्रोधाचे स्थान कपाळ आहे. क्रोध शरीराला जाळणारा आहे. प्रसन्न मनाने जेवण घेतले तर ते अमृतासारखे पण क्रोधामध्ये जेवण विषाचे काम करते. आपले मानसिक संतुलन याच्यामुळे बिघडते. अन्नपाचन होत नाही. अनेक पोटाचे आजार क्रोधामुळे उद्भवतात.