________________
(२३४)
alorMOH
मतपरुष खरेतर क्रोधित होतच नाहीत. समजा क्रोध आलाच तर तो दुसऱ्या
न जातो. कदाचित टिकलाच तर त्याचे फल विपरीत होत नाही. पण यामुळे वीतरागी बनू शकत नाहीत. वीतरागी बनण्यासाठी संपूर्ण कषायाचा त्याग पाहिजे.
संज्वलन क्रोध - याला क्षिप्र क्रोध पण म्हणतात. असा क्रोध पाण्यात ल्या रेघेप्रमाणे असतो. पाण्यातील रेघ त्याच क्षणी मिटते तसेच अशा प्रकारचे साधक शाच्या चारी अवस्था पार करून आत्मसाध्य साधून घेतात. परंतु थोडासा क्रोधाचा कर राहिल्यामुळे पुन्हा तो अंकुर जाळण्यासाठी जन्म घ्यावा लागतो. निर्वाणासाठी कषायाची संपूर्ण क्षिणता आवश्यक आहे.८४
क्रोधामुळे भावना अशुभ होतात. लेश्या अशुभ होतात. - जेव्हा मनुष्य क्रोधाविष्ट होतो तेव्हा त्याचा रंग नीळा म्हणजे काळपट असा होतो. त्याची कांती नष्ट होते. क्रोधग्नित तो जळू लागतो. थंड असली तरी त्याच्या घश्याला कोरड पडते. आणि पिशाच संचारल्याप्रमाणे कंपित होतो. भुवया चढतात, कपाळावर सल पडतात. डोळे लालबुंद होतात. हे असे त्याचे रूप होते. आणि तो भयानक दिसू लागतो.
क्रोधी मनुष्य क्रोधाच्या अग्नीत प्रथम स्वतःच जळतो. ज्यावर क्रोध केला आहे तो जळो अथवा न जळो पण तो स्वतः मात्र त्यात जळतोच.
क्रोधी स्वतः संतप्त होतो. नंतर दुसऱ्याला दुःखी करतो. खरं म्हणजे दुसऱ्यांना दुःखी करणे हे त्याच्या हातात नाही. ज्याच्यावर केला जातो कदाचित ती व्यक्ती शुभकर्माच्या उदयात असेल तर त्याचे कोणीही काही ही बिघडवू शकत नाही.
अग्नी आपल्या आधारभूत लाकडांना प्रथम जाळतो नंतर स्वतः नष्ट होतो.
क्रोधी मनुष्य कुणावरही उपकार करू शकत नाही. क्रोधी शत्रूवर मात्र उपकार करतो कारण त्याचा क्रोध पाहून शत्रू आनंदित होतो.
- मनुष्य ज्याच्यावर क्रोध करतो. त्या व्यक्तीच्या गुणांचा त्याला पूर्णपणे विसर पडतो. त्याच्या गुणांची निंदा करतो. अशोभनीय वचन बोलतो. क्रोधामध्ये त्याचे वागणे नरकातील नारकीयासारखे होते.
वर्षभर मेहनत केल्यानंतर शेतात पिकलेले धान्य एखाद्या लहानश्या ठिणगीने नष्ट होऊ शकते त्याचप्रमाणे क्रोधरूपी अग्नीत मुनींचे अमूल्य पुण्य नाश पावते.