________________
(२३५)
अत्यंत सुंदर असणाऱ्या व्यक्तीचे क्रोधामुळे रूप नष्ट होते. क्रोधामुळे तो पुढील कित्येक जन्मांमध्ये कुरूप राहतो..
गोधामळे प्रिय व्यक्ती अप्रिय होतात. त्याचे यश तर नष्ट होतेच पण तो हिंसा बोटे बोलतो, चोरी करतो. म्हणून पुढील जन्मात त्याची हत्या होते. त्याच्यावर
लावले जातात. त्याचे धन चोरीला जाते. क्रोधाचा असा भयंकर परिणाम होतो की पढील कित्येक भवात त्याला दुःख भोगावे लागते."
अशा विनाशकारी क्रोधापासून दूर राहण्यासाठी क्षमारूपी ढाल सतत बाळगावी लागते. हेच ह्या क्रोधाचे खरे शस्त्र आहे.
अपराध न करता पण कुणी अपराधी ठरवून शिव्या देऊ लागला तर त्याला पुन्हा शिव्या न देता क्षमा धारण केली पाहिजे. कुणी आपल्याला ठग, कपटी, चांडाळ अशा अपशब्दाने संबोधले, त्यावेळी असा विचार करावा की, हा माझ्या पूर्व जन्मीचे स्मरण करून देत आहे. पूर्वी मी असे अनंत भव केलेले आहेत, तरी मला समज आली नाही, आता तरी मला समजले पाहिजे.
मानानुबंधी भावना चार कषायांपैकी दुसरे स्थान आहे मान. अभिमानी व्यक्ती आपल्या कणभर गुणाला मेरुपर्वतासमान मोठे मानतो आणि इतरांच्या महान गुणांना कणभर मानतो. तो गुणवानांची कदर करीतच नाही. तुच्छ मानतो. यामुळे गुणवानांचे गुण काही कमी होत नाही किंवा त्यांचे काहीच नुकसान होत नाही. नुकसान होते ते अभिमानी व्यक्तीचे. जगात एकापेक्षा एक बलवान, बुद्धिमान, ऐश्वर्यवान लोक आहेत. त्यांच्याकडे नजर केली तर आपण किती हीन आहोत हे कळेल व अभिमान टिकणारच नाही.
__ अभिमानी स्वतःला फार मोठा समजतो पण इतर त्याच्या संपर्कात येणारे त्याला होन तुच्छ समजतात. त्याच्या अहंकारामुळे पण अहंकारी माणसाला 'अहंकार' हे कळू देत नाही.
__ अभिमान असला की इतर अनेक गुण असले तरी ते झाकून जातात. अभिमानी व्यक्तीची कुणी ही प्रतिष्ठा ठेवत नाही. म्हणून मान-अभिमान अहंकार विवेकी माणसाने करूच नये ८६
विवेकी माणसाच्या दृष्टीने अभिमान हा महाविनाशकारी आहे. संपूर्ण साधना