________________
(२३०)
वरील २५ भेद कषायांचे आहेत. व्यवहारात आपण फक्त चार कषाय क्रोध, माया. लोक यांनाच कषाय मानतो. परंतु ज्ञानी जनांनी चार कषायांची तरतमता मात घेऊन त्यांचे अजून सोळा भेद केले. शिवाय हास्य, रती, अरती यांचा पण कपायांत समावेश केला आहे.
याप्रमाणे कपायांचे चार, सोळा, पंचवीस भेद केले आहेत. ते आपणाला सरळपणे मजावे म्हणून केले आहेत. विशेष खोलवर विचार केला तर जगात जितक्या म्हणून पापमय प्रवृत्ती आहेत त्या सर्वांचा समावेश कषायातच होतो. म्हणून कषायाचे अनेक भेद होऊ शकतात.
_ मुख्यतः चार-क्रोध, मान, माया, लोभ यात त्या सर्वांचा समावेश होऊ शकतो. चार कषाय पापप्रवृत्ती वाढविणारे आहेत. म्हणून जो साधक आत्महित करू इच्छितो त्याने या चार कषायांचा त्यागच करायला पाहिजे.७२
आगमामध्ये सर्वत्र या चार कषायांचा उल्लेख असतोच. अनन्तानुबंधी इत्यादीचे एका-एका कषायाचे चार भेद आहेत. ते विषय-विकाराच्या आसक्तीच्या दृष्टीने केले आहेत. आसक्ती व्यक्त होते ती या चार कारणानेच.
कषायामध्ये अनन्त शक्ती आहे. असे सुद्धा घडते की अत्यंत तीव्र कषाय केल्याने आत्म्याचे प्रदेश शरीराबाहेर जाऊन आपल्या शत्रूचा धात पण करू शकतात. याला कषाय समुद्घात'' म्हणतात.
कषायामुळे आपल्या स्वतःच्या आत्मस्वरूपाचासुद्धा घात होतो. म्हणून कषाय करणे म्हणजे हिंसा करणे.
ज्यावेळी मनात कलुषित भाव निर्माण होतात आणि ते व्यक्त केले जातात, तेव्हा तर भयंकर अनर्थ ओढवतो. यापासून वाचण्यासाठी क्रोध इ. चार कषायांचे थोडक्यात वर्णन केले आहे. जर कषाय काय आहेत व त्यामुळे आपले किती नुकसान होते हे कळालेच नाही तर त्याग कसा होणार !
म्हणून मुमुक्षू जीवाने कषाय भाव नीटपणे समजावून घ्यायला पाहिजे. ज्याप्रमाणे कल्हई नसलेल्या पितळेच्या भांड्यातील दूध (उत्तम असले तरी) त्या भांड्यातील दूध बेचव होते. त्याचप्रमाणे कषायरूपी दुर्गुणाने आत्म्याचे संयम इत्यादी गुण नष्ट
होतात.