________________
(२२४)
n awathames
लण्य स्वतःची प्रतिष्ठा म्हणजे परिग्रहाची वृद्धी मानतो. हिंसकाने हिंसा केली होतो. खोटे बोलणाऱ्याला कोणी खोटारडा म्हटले तर अपमान वाटतो. चोराने
तो मी चोर आहे अशी काही दवंडी पिटत नाही. व्यभिचारी लपून-छपन
चोरी केली तर तो मी चोरी व्यभिचार करतो.
PHARMmmonwee
ह्या सर्व पापांचे आचरण करणारे पापाची प्रशंसा करीत नाहीत. परंतु परिग्रही मारा पापी स्वतःला पापी समजतच नाही. आणि हे असे आसक्तीयुक्त पाप करूनही जित होत नाही. उलट स्वतःला मोठा भाग्यवान समजतो. आपला गौरव मानतो. जो जितका मोठा परिग्रहधारी पापी तो तितकाच मोठा, पुण्यशाली समजला जातो. वास्तविक पण्याच्या पुण्यशाली प्रकारामध्ये धन-संपत्तीचे कुठे नावनिशाण सुद्धा नाही. मग धनवानांना पुण्यशाली कशाच्या आधारावर म्हणतात हा एक प्रश्नच आहे.
- मनुष्य जन्म मिळणे पुण्य आहे, पण पैसा मिळणे पुण्य आहे हे काही सत्य नव्हे. पैशामुळे तर अनेक पापे होतात. पैसा तर परिग्रह आहे म्हणजे पापच. परंतु आश्चर्य आहे की धनाच्या गुलामांनी त्याला पुण्य सांगून त्यावर आवरण पुण्याचे घातले आहे. ही मानवजातीच्या पतनाची पराकाष्ठा आहे. जोपर्यंत भगवान महावीरांच्या अपरिग्रह सिद्धांताला स्वीकारले जाणार नाही तो पर्यंत कल्याण नाही. आणि अशान्ती ही दूर होणार नाही.६३
कारण "अर्थमनर्थ भावय नित्यम्" अर्थ हाच खरोखर अनर्थ आहे.
सगळे दोष परिग्रहामुळेच उत्पन्न होतात. “हे माझे" असा संकल्प असला म्हणजे संरक्षणाची भावना होते. आणि यामुळेच हिंसा होते. असत्य बोलले जाते, चोरी केली जाते. मैथुन प्रवृत्ती जागृत होते. नरक इत्यादीचे दुःख ह्या परिग्रह भावनेमुळेच भोगावे लागतात.६४
ज्याप्रमाणे घाणेरड्या पाण्याच्या डबक्यात दगड टाकाला तर तळाशी असणारा चिखल उसळून वर येतो त्याचप्रमाणे परिग्रह जीवातील कषायाला प्रकट करतो.६५
परिग्रहाच्या स्वरूपाचे चिंतन करणारी व्यक्ती त्याचे दुष्परिणाम जाणते. अशा आत्मार्थी साधकाने पर पदार्थापासून दूर रहावे त्याचा त्याग करावा आणि आत्मस्वरूपाच्या भावनत लीन होऊन जावे. ज्याला आत्मस्वरूप प्राप्त करण्याची इच्छा नाही. आत्म्याच्या उत्कषांची चिंता नाही तो पर द्रव्याचा त्याग करू शकत नाही.
__ बाह्य पदार्थ माझे नाहीत. मी कधीच त्यांचा होणार नाही. असे चिंतन करावे व बाह्य वस्तूंच्या आकर्षणापासून स्वतःला दूर ठेवून मोक्षाची अभिलाषा ठेवावी.
TARAHAS