________________
(२२३)
"ग्रह " चा शाब्दिक अर्थ 'पकडणे' होतो. आकाशात दोन प्रकारचे ग्रह आहेत.
एक सौम्य आणि एक क्रूर. हे ग्रह मनुष्यसृष्टीपासून दूर आहेत. तरीही त्यातील काही ग्रह
मनाला
आनंदित करतात. दुसरे ग्रह आतंकित करतात. मग आपण या दूर असणाऱ्या शांती करण्यासाठी अनेक उपाय योजतो, परंतु हृदयरूपी गगनमंडपात असलेल्या परिग्रह रूपी मोठ्या ग्रहाची शांती करण्यासाठी काहीच उपाय योजीत नाही. परिग्रह जीवाला अही बाजूने घेरतो. फक्त शरीरानेच नव्हे तर मनाने आणि इंद्रियांनी सुद्धा बद्ध होतो. “परिसमन्तात गृह्यते इति परिग्रह. '
11
जखडून
सरकारी शिपाई तर अपराध्याच्या शरीराला बांधतो पण परिग्रह तर आत्म्याला टाकतो. गगन मंडळात असलेले ग्रह साधारण आहेत पण परिग्रह तर महाग्रह आहे. भौतिकवादी आस्था ही परिग्रहाची जननी आहे.
परिग्रहाचे दुसरे नाव 'दौलत' आहे. ज्याचा अर्थ दोन तत म्हणजे दोन वाईट सवयी ह्या दोन बाईट सवयीमध्ये पहिली सवय म्हणजे परिग्रह. म्हणजे ज्याच्याजवळ दौलत आहे तो कोणाचाही हितोपदेश ऐकत नाही. गुणी, खरा सल्ला देणारे आणि वंदनीय व्यक्तींबद्दल आदरभाव नसतो. म्हणजेच परिग्रहामुळे ज्ञानचक्षुवर आवरण आलेले असते.६१
संसारात पित्याला आपल्या पुत्राचा उत्कर्ष पाहण्याची इच्छा असते. आणि अध्यात्म क्षेत्रात गुरुता शिष्याचा उत्कर्ष पाहण्याची इच्छा असते. परंतु या परिग्रहाच्या आसक्तीमुळे अमृताचे विष होते.
राजाश्रेणिक व पुत्र कोणिक यांचा इतिहास असाच आहे. राजा श्रेणिक वृद्ध झाले होते तरी सारा राज्यकारभार स्वतःच पहात होते, ह्यांचा पुत्र कोणिक मनात विचार करतो माझे किती दुर्दैव आहे की वडील वृद्ध झाले तरी राजगादी काही सोडीत नाहीत. आणि त्यांना मृत्यू ही येत नाही. हे जीवंत आहेत तोपर्यंत मला काही राजगादी मिळणार नाही. मी राजा होऊ शकणार नाही. कोणिक ही राजपुत्र होता. खूप सुखात लोळत होता, पण राजा होण्याचा जो परिग्रह (आसक्ती) तो त्याला काही स्वस्थ बसू देत नव्हता. शेवटी युक्ती प्रयुक्तीने आपल्याच पित्याला तुरुंगात डांबले व स्वतःला सम्राट घोषित केले. इतके करूनही त्याचे समाधान झाले नाही. त्याच्या भावाजवळ एक हत्ती आणि हार होता तो ही त्याला हवा होता. तो घेण्यासाठी मिळविण्यासाठी त्याने आपले आजोबा ( आईचे वडील) ज्यांच्याजवळ भाऊ रहात होता त्यांच्यावरही आक्रमण केले. रक्ताचे पाट वाहिले. या सर्व अनर्थाचे कारण एकच परिग्रह, मूर्च्छा, ईच्छा. ६२