________________
2381
(२२२)
सुखा परिग्रह आहे
आहे तदनंतर चारित्र मोहनीय कर्माचा जितक्या प्रमाणात क्षय, उपशम अथवा मम होईल तितक्या प्रमाणात परिग्रहाचा त्याग होऊ शकेल.५५
या शिवाय परिग्रहापासून सुटका मिळणे फारच कठिण आहे. संपूर्ण पृथ्वीवरील बाट साम्राज्याचे सुख भोगले तरी मानवाची तृष्णा शांत होत नाही. “जहा लाहो तहा
M
ना माहो"५६
anoraniclininalseasewapsues
Nasee
जितक्या प्रमाणात लाभ होत जातो तितक्या प्रमाणात लोभ वाढत जातो. म्हणून परिग्रह वाढवून संतोष मिळेल अशी भावना ठेवतात ते आगीत तूप टाकून आग विटाविण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. अग्नीत तूप टाकून ती विझत नाही हे जितके
त्य आहे त्याचप्रमाणे परिग्रह वाढवून संतोष मिळणे शक्य नाही. परिग्रहाचा त्याग करण्यासाठी लोभाचा प्रथम त्याग करणे जरूरी आहे.
मनुष्य आयुष्यभर जे वेगवेगळे काम करतो त्याने परिग्रहाची वृद्धी होते. प्राचीन काळी पुरुषांसाठी बहात्तर कला व स्त्रियांसाठी चौसष्ट कला शिकवल्या जात त्यासुद्धा काय आहेत ? परिग्रहाची भावनाच त्यामागे आहे.५७
_ आधुनिक काळात तर इतक्या प्रकारच्या कलांचा आविष्कार झाला आहे की त्यांची यादी करणे ही कठीण आहे. या सर्वांच्या मागे परिग्रहाची भावना आहे.
परिग्रह म्हणजे संग्रह करणे एवढाच याचा अर्थ नाही. परिग्रहाची व्याख्या फार विशाल व सखोल आहे. आपण ज्या संप्रदायाला मानतो ह्या संप्रदायाबद्दल ममत्व असणे हा सुद्धा परिग्रह आहे. त्या संप्रदायाबद्दल मोह असणे हा खरा परिग्रह. आपल्या संप्रदायाबद्दल ममता व अन्य संप्रदायाबद्दल द्वेष असणे हा एक भयंकर परिग्रह आहे. आमचाच संप्रदाय श्रेष्ठ, आमचेच साधू खरे साधू, तेच उत्कृष्ट आणि क्रिया करण्यात उत्कृष्ट आहेत, अशी आपल्याच फक्त धर्माबद्दल आसक्ती असणे हाही परिग्रहच आहे. त्याचप्रमाणे राष्ट्र, प्रांत भाषा इ. बद्दल अंधविश्वास किंवा कट्टरता, आसक्ती, मूर्छाभाव असणे हे परिग्रहाचेच रूप आहे.
म्हणूनच दशवैकालिक सूत्रात लिहिले आहे की "मुच्छा परिग्गहोवुतो'५८
मूर्छाभाव वास्तविक परिग्रह आहे. तत्वार्थ सूत्रात सुद्धा "मुर्छा परिग्रहः'' हे सूत्र आहे.५९
निश्चयदृष्टीने विचार केला तर प्रत्येक वस्तू परिग्रह आहे आणि मूर्छा भाव नसेल तर वस्तू उपलब्ध असूनही अपरिग्रह आहे.६०
।