________________
(२२०)
च्या शरीराला जाळते, मदोन्मत हत्ती व क्रोधी साप एकाच देहाला नष्ट
अब्रह्मचर्याची भावना ज्ञान, शील, विनय, लज्जा, वैभव, विज्ञान व शरीर सर्व इहलौकिक व पारलौकिक गुणांना जाळून भस्म करते.५२
अब्रह्मचर्याचा दुसरा अर्थ आहे. स्व-स्वभावाला सोडून, पर-स्वभावात, परगीत रमण करणे. आसक्त होणे. स्व-स्वभाव म्हणजे ब्रह्म. पर-स्वभाव अब्रह्म आहे. अब्रह्मात जीवन जगणे म्हणजेच संसार आहे.५३
परिग्रह संबंधी भावना पाणी वहात नसेल तर ते घाणेरडे व अशुद्ध होते. तशा पाण्याला दुर्गंधी येते. खप दिवस घर बंद ठेवले तर ते उघडताच कुबट वास येतो. त्याचप्रमाणे जर आपल्या जीवनात सद्चारित्र नसेल तर जीवन अशुद्ध होते. घाणेरड्या पाण्याप्रमाणे त्यात दगुणांची दगंधी येऊ लागते.
_ जो माणूस धन संग्रह करून ठेवतो, त्याच्या जीवनात हिंसा, असत्य, चोरी, लोभ इत्यादी अनेक दुर्गुणांची दुर्गंधी येऊ लागते. धनसंपत्तीवर आसक्ती न ठेवता त्याचे योग्य वितरण केले पाहिजे व दान केले पाहिजे. दान करून धनाचा प्रवाह वाहता ठेवला तर कोणतेही दुर्गुण आपल्यात निर्माण होत नाहीत.
आज मानवी दृष्टिकोण पार बदलला आहे. धन-संपत्तीच्या लोभामुळे अनेक दुष्कृत्य होऊ लागली आहेत. मानव धनाला खात नाही तर धन मानवाला खात आहे. धनाच्या लोभामुळे माणसातील माणुसकी नष्ट होत आहे. जोपर्यंत जीवनात संग्रहवृत्ती आहे, तोपर्यंत अन्याय हिंसा चालूच राहणार. अशा माणसाच्या जीवनात धर्म, कर्माला महत्त्वच नाही.
श्रमण भगवान महावीरांनी म्हणूनच सांगितले आहे की दोन कारणांमुळे मनुष्य वीतराग धर्माचे श्रवण करू शकत नाही. "आरम्भचेव परिग्गहे चेव' आरम्भ आणि परिग्रह. है दोन्ही साधनेच्या मार्गावरील सर्वात मोठी अडचण आहे.
परिग्रहाची व्युत्पत्ती करताना शास्त्रकार म्हणतात - "परिग्रहणं परिग्रह" अर्थात ज ग्रहण केले जाते तो परिग्रह आहे. ग्रहण तेच केले जाते ज्यावर ममत्वभाव आहे. हा ममत्वभावामुळेच जन्म-मरणाची वृद्धी होते. ममत्वभाव आत्म्याला उन्नत होऊ देत नाही. मोक्षमार्गावरील सर्वात मोठा हा अडथळा आहे.