________________
१) अतिभोजन करणे २) तेल इ. ने शरीराचे मर्दन करणे ३) सुगंधित पुष्प, अत्तर इ. चा उपयोग करणे ४) कामविकार निर्माण करणारे संगीत, नृत्य इ. पाहणे. ५) शय्या-क्रीडागृह, चित्रशाला इ. शोध करणे ६) नयनबाणाने घायळ करणाऱ्या स्त्रियांच्या सहवासात राहणे ७) शरीराला वस्त्र, अलंकाराने विभूषित करून आकर्षण निर्माण होईल असा - वेश धारण करणे ८) पूर्वी भोगलेल्या सुखाचे स्मरण करणे ९) शब्द, रूप इ. इन्द्रिय विषयात आसक्ती ठेवणे १०) इन्द्रियांना पुष्ट करणारे चविष्ट पदार्थांचे म्हणजे तामसी पदार्थाचे सेवन
करणे.४८
यापैकी कोणत्याही एकाचे जरी सेवन केले तरी ब्रह्मचर्याचे पतन होते. म्हणून साधकाने या गोष्टीपासून सतत दूर राहण्याचाच प्रयत्न करायला पाहिजे. जेणे करून मनसुद्धा विषयासक्त होणार नाही.
अब्रह्मचारीचे चित्त सतत विषयकामनेत गुंग असते. मोहाचा पडदा त्याच्या डोळ्यावर असतो. कार्याकार्याचा त्याच्या जवळ विवेक नसतो. ज्याप्रमाणे हत्तीला पकडण्यासाठी जंगलात हत्तीला हत्तीण दाखवतात व त्याला मोहात बळी पडलेल्या हत्तीला पकडले जाते. त्याचप्रमाणे माणूस विषयवासना रूप स्त्रीच्या फंदात पडला की त्याचा सर्वनाश तर होतोच पण परलोकात अशुभगती प्राप्त होते. म्हणून ब्रह्मचर्याचे पालन करावे अब्रह्मचर्याचा त्याग करावा.१९
आपल्या पत्नीशिवाय बाकी सर्व स्त्रियांना माता-बहिण मानावे. परस्त्रीचा मोह कधीच करू नये.५० कारण मैथुन सेवनामध्ये प्रत्यक्ष हिंसा आहे. ज्याप्रमाणे तिळाने भरलेल्या नळीमध्ये खूप गरम लोखंडाची सळई घातली तर ते तिळ जळून जातात त्याचप्रमाणे मैथून क्रियेत स्त्रीच्या योनीत असलेले जीव लगेच मरतात.५१ ज्याप्रमाणे राक्षस माणसाचे रक्त शोषून घेतो व जीवन नष्ट करून टाकतो त्याचप्रमाणे वासना मानवातील शान इ. गुणांचा व संयमी जीवनाचा. धर्मरूपी धनाचा सर्वनाश करते.
rimantuinapriawant.animilandantaran
n
o
Editaintenti