________________
(२०९)
र होतो. म्हणून मुसावायं वि वजिजा३२ असत्य बोलण्याचा त्याग केला
असत्य बोलल्यामुळे जीव श्रद्धेचा/विश्वासाला पात्र रहात नाही. इहलोकात नादी अनेक अशुभ दुःखमय फळे मिळतात व ज्यांच्याविषयी असत्य बोलले त्याला सुद्धा खूप दुःख प्राप्त होते व तो दुःखित होऊन कायमची शत्रुत्वाची गाठ तो याचा अर्थ असा की असत्य वचनामुळे जितके दुःख त्याला प्राप्त झाले होते पेक्षा अधिक दुःख असत्य बोलणाऱ्याला प्राप्त होते. ह्या असत्याच्या फलस्वरूपी लोकात अशुभगतीमध्ये भ्रमण करावे लागते. तसेच तेथे दुःख भोगावी लागतात. आणि या लोकात व परलोकात निंदेचे पात्र बनावे लागते. म्हणून असत्यवचनापासून दूर राहणेच प्रेयस्कर आहे.
असत्य बोलणाऱ्याचा आत्मविकास होणे 'आकाश-कुसुमवत' आहे.
स्थूल आणि सूक्ष्म भेदाने असत्य दोन प्रकारचे आहे. साधक जर असत्याचा पूर्णपणे त्याग करू शकत नसेल तर त्याला त्याची मर्यादा तरी कमीत कमी केली पाहिजे. तसेच दुसऱ्याला दु:ख होईल अशा असत्याचा त्याग केला पाहिजे. जगात लाखो करोडोंच्या घेण्यादेण्याचे व्यवहार मात्र सत्याच्या आधारावरच होतात. जर विश्वास तोडला तर विश्वासघातकी ठरेल, असत्याने विश्वासघात होतो. असत्याचे पाच प्रकार आहेत -
- १) कन्यालिक - अलिक हा सुद्धा असत्याचा एकार्थवाचक शब्द आहे. कन्येसाठी असत्य बोलणे. कन्येचा विवाह करण्यासाठी तिचे दोष न सांगता केवळ गुण सांगणे. वयाने लहान असेल तर मोठी असल्याचे सांगणे किंवा मोठी असेल तर लहान सांगणे हीच गोष्ट मुलाच्याबाबतीत लागू होते. नोकरीसाठी सुद्धा खोटे बोलणे असा खोटेपणा केल्यावर कन्या सासरी सुखी जीवन प्राप्त करू शकत नाही आणि संसार दुःखमय होतो.
२) गवालिक - गाय, म्हैस इ. पशुंसाठी असत्य बोलले जाते. गाय, म्हैस दूध देत नसल्यास देते असे सांगणे पशुपक्षी रोगी, निरुपयोगी असले तरी चांगले असल्याचे सागणे. दुसऱ्याच्या गळ्यात असत्य बोलून प्राण्यांना घालणे. हे पशूसंबंधी असत्य बोलणे
आहे.
३) भौमालिक - भूमीसाठी असत्य बोलणे. दुसऱ्याच्या भूमीला स्वतःची सांगणे. टक्स/कर वाचविण्यासाठी स्वभूमीला दुसऱ्याची सांगणे.