________________
(१२८)
हिंसा करू नये. त्यासाठी सतत जागृत राहिले पाहिजे. जसे आहार शरीराच्या साठी नसून संयमाच्या पुष्टीसाठी आहे, त्याचप्रमाणे उपकरण ठेवण्याचे विधानसुद्धा पसाच्या पोषणासाठी आहे. त्याची देखरेख करण्याचे कारण हेच आहे की त्यात कोणात्याही जिबिताची हिंसा होऊ नये. असे चिंतन सतत केल्याने आणि अशी भावना मनात ठेवल्याने घेण्याठेवण्याची प्रवृत्ती हिंसाजनक होत नाही.
अनालोकित म्हणजे न पाहता आहार(५) आलोकित पान भोजन भावना पाणी घेतल्याने हिंसा होते. म्हणून अहिंसेचे आराधक, साधक नीट निरीक्षण करून आहारपाणी घेतात. १२
अन्न-पाणी घेतल्याशिवाय देहयात्रा चालत नाही. हे दैनंदिन होणारे कार्य आहे. साधकाने चांगल्याप्रकारे निरीक्षण, परीक्षण करून आशनपान केले पाहिजे. तसे केल्याने तो पापकर्मापासून दूर राहतो. असे चिंतन साधकाच्या मनामध्ये निरंतर चालत राहिले पाहिजे की अन्न-पाणी घेतांनाही कोणत्याही प्रकारे हिंसा होऊ नये, म्हणजे साधक त्यात आसक्त होत नाही कारण खाण्यासाठी जीवन नाही. हे जीवन जगण्यासाठी आहे. असा विचार केला तर औद्देश्यिक इत्यादी दोष आणि स्वादलोलुपता या सारख्या हलक्या वृत्ती सुटतात. साधकाने ह्या विचाराने मनामध्ये पुन्हा पुन्हा चिंतन केले तर तो हिंसेपासून बाचू शकतो.
अशाप्रकारे जो साधक अहिंसामहाव्रताच्या पाच भावनांना स्पर्श करतो, त्यांचे पालन करतो, नीर्णता करतो अर्थात कितीही संकटे अथवा प्रलोभने आली तरी जो त्यांचे पालन करतो, स्वतःच्या निश्चयापासून ढळत नाही, किर्तना म्हणजे महाव्रतामध्ये दृढ रहातो, बिचलित होत नाही तोच खरा निर्गन्थ आहे असे केवली भगवानांनी सांगितले आहे.
?
ह्या भावना जैनांच्या “अहिंसा परमोधर्मः" या सिद्धातांची पुष्टी करतात, म्हणून अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
सत्य महाव्रताच्या पाच भावना
१) अनुविची भावना - चिंतन करून बोलावे योग्य असे बोलावे, विचार न करताच बोलणाऱ्या साधकाला मिथ्या भाषेचा दोष लागतो म्हणून चिंतन करून बोलणाऱ्या साधकाला निर्ग्रन्थ म्हणतात. १३
सत्य वचनाचा संबंध वाणीबरोबर आहे. निरंतर सत्य भाषेचा प्रयोग करणे साधूसाठी आवश्यक आहे. परंतु तसे करणे सोपे नाही. वाणीमध्ये तशी दृढता आणण्यासाठी