________________
बलभद नारायणाने द्वारकेमध्ये मद्य निषेधाची घोषणा केली. मंदिरेचे भांडे
तप सुरू केले. बलभद्र नारायणाले,
त्याची सर्व सामग्री मंदिरावाल्यांनी बाहेर फेकून दिली. ती मदिरा व मद्याची सारी
पाण्यात पसरून गेली.
बारा वर्षे पूर्ण झाल्यावर द्वैपायन द्वारकेच्या बाहेर येऊन योग साधना करू लागले. वान नेमिनाथांच्या वचनावर श्रद्धा ठेवली नाही. इकडे शंभवकुमारादी क्रिडा करत असताना तहान लागली म्हणून पाण्याच्या शोधात नगरीच्या बाहेर आले आणि कुंडात पाणी समजून पिऊन टाकले. त्या मदिरेमुळे कुमार उन्मत्त झाले तेथे द्वैपायन मुनी उभे आहेत हे पाहून दारूच्या नशेत, हे द्वारकेला भस्म करणार आहेत अशाप्रकारे बोलून दगडांनी मारू लागले तेव्हा द्वैपायन जमिनीवर पडले. त्यांना भयंकर क्रोध आला. त्यामुळे द्वारका जळन भस्मीभूत झाली. अशुभ भावनेमुळे द्वैपायन मुनींना अनंत अशा संसारात परिभ्रमण करावे लागले.३
अशुभ भावनेचे अशुभ परिणाम जाणणे अत्यंत आवश्यक आहे. जरी बाह्य लिंग शुद्ध असले तरी भाव विशुद्धी शिवाय त्याचा काहीच फायदा नाही. बाह्यभाव चांगले आहेत परंतु अंतरंगात पैशुन्य-दुसऱ्यांचे दोष दाखविण्याची सवय, हास्य-दुसऱ्यांची चेष्टा करणे, मत्सर आपल्या बरोबरीचे जे आहेत त्यांची ईर्ष्या करून दुसऱ्याला कमी दाखविण्याची बुद्धी ठेवणे, माय-कुटिल परिणाम हे भाव खूपच दिसून येतात. विशुद्ध भावनेशिवाय बाह्यवेष धारण करणे योग्य नाही.४
जो शुद्धस्वरूपाच्या भावनेने रहित आहे तो जैनशासनामध्ये समाधी अर्थात धर्मशुक्लध्यान आणि बोधी म्हणजे सम्यग्ज्ञान, दर्शन चारित्रस्वरूप मोक्षमार्ग प्राप्त करू शकत नाही. ज्यांची भावना शुद्ध आहे तो स्वर्ग-मोक्षाचा पात्र आहे आणि ज्याची भावना मलिन आहे तो तिर्यंच गतीत निवास करतो.५
अशाप्रकारे आत्म्याचा क्रमिक विकास भावविशुद्धीवर अवलंबून आहे. म्हणूनच आचार्य कुंदकुंद यांनी भावनेचे तीन प्रकार सांगितले आहेत १) शुभ २) अशुभ
३) शुद्ध.
भावना जेव्हा अशुभ धारेमध्ये वाहू लागते तेव्हा ती मानवी जीवनाला पतनाकडे, दुर्गतीकडे घेऊन जाते. तपस्वी आणि योगीराजाला देखील नरकगतीचा अथवा दुर्गतीचा अतिथी बनविते. म्हणून शास्त्रामध्ये अशुभावनेचे स्वरूप दर्शविले आहे.
सर्वप्रथम अशुभ भावनेला समजून त्याचा परित्याग केला पाहिजे. बाह्य हिंसा