________________
(२०४)
कष्ट सहिष्णुता -
अहिंसेचे तिसरे तत्त्व आहे
आज कष्ट सहिष्णुतेची चर्चा प्रतिकूल वाटते. आज तर सुविधावादी धारेचा बोलबोला आहे. निवडणुकीतही नेते आश्वासन देतात की आम्हाला निवडून द्या. आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त सुविधा प्राप्त करून देऊ. या सुविधावादी दृष्टिकोनामुळे जास्तीत जास्त हिंसा वाढत चालली आहे. सुविधावाद आणि हिंसा यांचा फार घनिष्ठ संबंध आहे. जसजशी कष्ट करण्याची क्षमता कमी होईल तसतशी हिंसेची साहाय्यता घ्यावी लागेल. शारीरिक, मानसिक असहिष्णुतेने हिंसेची वृद्धी केली आहे. एखाद्याला कोणतीही घटना सहन झाली नाही की लगेचच तो आत्महत्या करण्याच्या स्थितीत पोहचतो. एक व्यक्ती दुसऱ्याने उत्पन्न केलेल्या अप्रिय स्थितीला सहन करू शकत नाही. २५
अशा परिस्थितीत आम्ही अहिंसेची कल्पना करू शकत नाही. अहिंसा एक शक्ती आहे, एक पराक्रम आहे. एक वीर्य आहे. भ्रमवश असे मानले आहे की अहिंसा दुर्बलांसाठी आहे. दुर्बलतेचा व अहिंसेचा काहीच संबंध नाही. अहिंसेला दुर्बलता स्पर्श करू शकत नाही व दुर्बलतेला अहिंसा स्पर्श करू शकत नाही. दोघांमध्ये जणू अस्पृश्य भाव आहे. अहिंसा आंतरीक अर्जेचा विकास आहे.
पराक्रमी व्यक्तीच अहिंसेचा विचार करू शकते. जर आम्ही कष्ट सहिष्णुतेला सोडून अहिंसेची कल्पना केली तर मात्र भ्रांती आहे. ह्या दोघांना कधीही वेगळे केले जाणे शक्य नाही.
आज ऋतूच्या प्रभावाला सुद्धा सहन करण्याची शक्ती नसल्याने घरोघरी हिटर व कुलर आलेले आहे.
एक माणूस मरणानंतर यमराजांजवळ गेला. यमाने त्याला विचारले, "तू कोठे राहू इच्छितो ? स्वर्गात की नरकात ?" तो म्हणाला, "मला स्वर्ग व नरक यांच्याशी काहीच घेणे देणे नाही, जेथे दोन पैशाचा फायदा होईल तिथेच पाठवा." असे आजचे मानवी मन झाले आहे. चांगले, वाईट ह्याची चिंता कोणीही करीत नाही. त्याला फक्त सुविधा हव्यात. त्या सुविधांसाठी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला जातो. तो प्रयत्नच समस्येचा निर्माता, समस्येचे कारण आहे.
सुखशांती पाहिजे असेल तर अहिंसेची आस्था मनात बाळगली पाहिजे. तसेच अहिंसेवर आस्था असेल तरच सुविधावादी आणि पदार्थवादी दृष्टिकोन बदलावे लागतील. कष्ट सहिष्णुतेनेच जगावे लागेल.