________________
(२०२)
मीनोपयोगी ज्या काही वस्तू मनुष्य खरेदी करीत असतो. त्यापूर्वी ती हिंसक
मक ह्याची पूर्णचिकित्सा केली पाहिजे. हिंसा का होते आणि अहिंसक जवन बनावण्या
विण्यासाठी काय केले पाहिजे ह्याचे सतत चिंतन केले पाहिजे तरच हिंसेच्या नी मिळू शकते. अहिंसेचा मुख्य पाठ विवेक आहे. विवेकरहित काम हिंसकरूप
धारण करते.
वस्तू लहान असो किंवा मोठे, मूल्यवान असो किंवा मूल्यरहित, सजीव असो निर्जीव त्याचा दुरुपयोगी करणे दुसऱ्याला उपयुक्त होणार नाही. असे करणे, दुसऱ्यांना उपयोगात येणाऱ्या, वस्तूला नष्ट करणे हिंसा आहे, घोर पाप आहे.
व्यक्तीमध्ये कोणत्याही लहानात लहान प्राण्याला उत्पन्न करण्याची, त्याच्या जीवनाचे नवनिर्माण करण्याची क्षमता नाही तर मग कोणाच्याही जीवनाशी खेळण्याचा आणि बनलेल्या घराला उद्ध्वस्त करण्याचा त्याला काय अधिकार आहे ? कोणाच्याही जीवनाचा अंत करणे, त्याच्या जीवनविकासामध्ये अडसर घालणे. हा जघन्य अपराध आहे. हे नैतिक पतन आहे तसेच महाहिंसा आहे. हिंसेचे उत्पत्ती स्थान - घृणा
धारणेत अथवा भावनेत परिवर्तन करणे हे हिंसेचे पहिले सूत्र आहे. हिंसेचे मूळ कारण घृणा आहे. जोपर्यंत घृणा येत नाही तोपर्यंत मनुष्य हिंसा करू शकत नाही. आज जितका आतंकवाद बोकाळला आहे तो सर्व घणेच्या आधारावरच चालला आहे. 2 अतिरेक्यांना समोरील पक्षाबद्दल घृणेचे प्रशिक्षण दिले जाते. ते इतकी घृणा त्यांच्या मनात निर्माण करतात की त्यांना इतरांना मारण्यामध्ये काहीच संकोच निर्माण होत नाही.
घृणेच्या जागी प्रेम निर्माण करण्याची अत्यंत गरज आहे. चोर, डाकू आपल्या घरातील लोकांना लुटत नाहीत. भेसळ करणारे व्यापारी घरच्या लोकांसाठी तेच सामान वापरत नाहीत. स्वतः शुद्ध पदार्थांचा उपभोग घेतात व दुसऱ्यांना खराब पदार्थ देतात. परंतु जेथे प्रेम असेल तेथे क्रूर व्यवहार होऊ शकणार नाही.
प्रेम उत्पन्न करणे. प्रेमाचा विकास करणे. मैत्रीचा विकास करणे हे अहिंसेचे दुसरे सूत्र आहे - कबीरांनी असे सांगितले आहे की -
"पोथी पढ पढ जगमुआ, पंडित भया न कोय ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय."