________________
(२०१)
चौथा अतिचार, अतिभार गाडीत अधिक भार भरून पशूद्वारे वाहन चालवणे हमा हिंसेचा दोष लागतो. पशूप्रमाणे नोकराची स्थितीसुद्धा खूपच खराब आहे. वा घोडा जर आजारी झाला तर त्याची चिकित्सा केली जाते. सायकल किंवा मोटार
घडली तर ती दुरुस्त केली जाते. परंतु नोकर जर आजारी पडला तर त्याची चिकित्सा करणे तर दूरच राहिले. परंतु तो जितके दिवस कामावर येत नाही तितक्या दिवसाचा याचा पगार कापला जातो. मनुष्याची किंमत घोडा आणि बैलापेक्षा सुद्धा कमी आहे. असे वागल्याने अतिभार दोष लागतो.
भत्तपाणविच्छेद-कोणाच्याही खाण्यापिण्यात अंतराय निर्माण करणे किंवा खाता खाता उठविणे, हिसकावून घेणे, खाऊन देणे इत्यादी भत्तपाण विच्छेद नामक पाचवा अतिचार आहे. दुष्काळाच्या वेळी स्वतःजवळ आवश्यकतेपेक्षा जास्त वस्तूचा संचय करणे सुद्धा हिंसेचा दोष आहे.
अशाप्रकारे कोणतीही हिंसात्मक प्रवृत्ती करण्यापूर्वी मनुष्याच्या मनात प्रथम तसे विचार येतात. पुन्हा पुन्हा हिंसकविचार हिंसानुबंधी भावनेचे रूप बनते व त्या हिंसक भावना जेव्हा क्रियात्मक रूप धारण करतात तेव्हा कर्मबंधने तर होतातच परंतु केवळ भावना हिंसक ठेवल्या, क्रियेत त्याचे रूपांतर होऊ दिले नाही तरीही हिंसक भावनेमुळे कर्मबंध होतो.
दुसऱ्यांना कष्ट देणे हे जसे हिंसक आहे तसेच आपली शक्ती असताना सुद्धा दुसऱ्याचे कष्ट दूर न करणे ही सुद्धा हिंसाच आहे.२४
मनुष्याचे प्रत्येक कार्य हिंसेशिवाय होत नाही. खाणे, पिणे, उठणे, बसणे, चालणे इत्यादी सर्व कामे करताना हिंसा तर होतेच. मग अहिंसेचे पालन कसे करू शकेल ? हा प्रश्न उपस्थित होतो. इंग्रजीमध्ये असे म्हटले जाते की Living is Killing जगण्यासाठी संहार करावा. लागतो. आणि संस्कृतमध्ये म्हणतात, “जीवो जीवस्य जीवनम्'' जीव, जीवाचे जीवन आहे आणि हे सत्यसुद्धा आहे की अन्नाच्या जीवांना खाऊनच मनुष्य जगतो. परंतु आपण असेच समजून बसलो तर अहिंसेचे पालन कसे करू शकणार ? म्हणून विवेचकपूर्वक विचार केला पाहिजे की Killing the least is living the best अर्थात कमीत कमी हिंसा करून जास्तीत जास्त जीवनाला अहिंसक करायचे आहे. अल्पारम्भापासून जर आपण वाचू शकत नसू तर महारंभापासून (घोर हिंसेपासून) तरी वाचू शकतो.