________________
मोअप्राप्तीसाठी असो ती अधि नाही. हिंसा करणारा विभिन
यासाठी असो अथवा जन्म, जरा मृत्यूपासून सुटका होण्यासाठी अर्थात ही असो ती अहितकारकच आहे. हिंसेने मोक्ष प्राप्त होणे हे कधीही शक्य
सारा विभिन्न योनीमध्ये विविध वेदना आणि कष्टाचा अनुभव करून अनादी. अनंत चतुर्गतिरूप संसारात परिभ्रमण करतो १८ म्हणूनच
"हिंसा दुर्गते द्वारं, हिंसैव दुरितार्णव । की हिंसैव गहणं नमः, धर्मो न हिंसया ॥"१९
'हिंसा दुर्गतीचे द्वार आहे. हिंसा पापाचा समुद्र आहे. हिंसा घोर अंधकार आहे. हिंसा करताना धर्म होत नाही.
साधारण मनुष्य कोठेही स्वतंत्रतेपूर्वक फिरू शकतो. त्याला कोणत्याही प्रकारचे भय नसते. ज्यांच्या मनात अहिंसेची भावना असते ते एकटे सुद्धा जगात फिरू शकतात. गांधीजी हिंदु-मुस्लिम दंगलीच्या वेळी सुद्धा पाकिस्तानी क्षेत्रात फिरत होते कारण त्यांच्या मनात अहिंसेची पवित्र भावना होती.२०
हिंसेमुळे नरक तिर्यंच इत्यानी गतीमध्ये जीवाचे कसे हाल होतात ह्याचे विस्तृत वर्णन प्रश्नव्याकरण सूत्रात केले आहे.२१ विस्तारभयामुळे इथे त्याचे वर्णन केलेले नाही.
हिंसेचा परिणाम स्वतःच्या स्वभावावर अत्यंत वाईट होतो. दुष्ट हिंसायाम्-हिंसेमुळे चांगल्यात चांगला साधकही दुष्ट होतो.
__मनुष्य प्रज्ञाशील प्राणी आहे. पशुपक्षी ज्या स्थितीत पूर्वी राहत होते तसेच वर्तमानामध्ये सुद्धा राहतात. सुधारक शक्ती पशूमध्ये नाही. ही शक्ती मानवामध्ये आहे. परंतु जसजशी मनुष्याची प्रज्ञा-बुद्धी वाढते. तसतशी परिणामी अहिंसा जर वाढली नाही तर ती प्रज्ञा तारक राहणार नाही तर मारक बनते; उद्धारक नाही पण घातक सिद्ध होते. विज्ञान आज खूप मोठ्या प्रगतीच्या दिशेने पुढे जात आहे परंतु त्याबरोबर अहिंसा वाढलीच नाही त्यामुळे आज उद्धारकाच्या ऐवजी संहारक शक्तीचा जास्त जोर आहे. जर विज्ञानाबरोबर अहिंसा अथवा दयेचे संवर्धन झाले असते तर आज संहारकतेच्या ठिकाणी संरक्षणाची भावना वाढली असती.
हिंसेचा अर्थ मात्र प्राण्यांचा वध करणे इतकाच नसून कोणत्याही कार्याने जर दुसऱ्यांना दुःख होत असेल तर ती हिंसाच आहे. कोणालाही दुःख देणे हिंसा आहे आणि कष्ट न देणे अहिंसा आहे.