________________
(१९४)
असत्य वचनात कषायचा सद्भाव आहे. चोरीसुद्धा कषाय असल्यानेच केली
द्वेष
जाते. एखाद्या तिळाने भरलेल्या नळीत तापलेल्या लोखंडाची सळी टाकल्याने ज्याप्रमाणे तीळ जळून जातात त्याचप्रमाणे मैथुन क्रियेने जीवांची हिंसा होते. मिथ्यात्व, राग, इत्यादि अंतरंग परिग्रह तर हिंसेचे पर्यायवाची आहेतच. म्हणून त्यांच्यात हिंसा स्वयंसिद्ध आहे आणि बाह्य परिग्रहाच्या प्रती मूर्छाभाव आहे तो निश्चितपणे हिंसक आहे. १०
ह्यावरून असे स्पष्ट होते की असत्यादी उपरोक्त सर्व पाप हिंसेचे रूप आहे. जोपर्यंत मनुष्य हिंसेच्या स्वरूपाला समजत नाही तोपर्यंत त्याची हेयता कशी समजणार? म्हणून प्रथम हिंसेच्या स्वरूपावर विचार करू. जीव तर अजर, अमर, नित्य आहे. त्याचा वध संभाव नाही. मग हिंसा कोणाची होते हे जाणणे आवश्यक आहे.
हिंसेचे स्वरूप
कषाययुक्त योग अर्थात मन, वचन, कायारूपी त्रियोगाने द्रव्य आणि भावरूप दोन प्रकारच्या प्राणांचा घात करणे हिंसा आहे. ११ प्रमत्तयोगात म्हटले आहे प्राणव्यपरोपणं हिंसा | १२
प्रमादामुळे होणारा प्राणवध हिंसा आहे.
प्रमादामुळे म्हणजे रागद्वेषामुळे अथवा असावधनतेमुळे होणारा प्राण वध- प्राणवध म्हणजे काय ? हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. हिंसेचे एक प्रसिद्ध नाव 'प्राणवध'
आहे. ज्याला प्राणातिपात सुद्धा म्हणतात. प्राणवध म्हणजे शरीरात असलेल्या दहा प्राणांचे विघटन करणे. ते दहा प्राण आहेत “पञ्चेन्द्रियाणित्रिविधं बलञ्च, उच्छवास
निश्श्वासमथान्यदायुः प्राणा दशेते भगवद्भिरुका स्तेषां वियोगी करणं तु हिंसा ||"
श्रोत्रेन्द्रिय, चक्षुरेन्द्रिय, घ्राणेन्द्रिय, रसनेन्द्रिय, स्पर्शनेन्द्रिय इ. पाच इन्द्रिये काया, चाचा, मन इ. तीन बळ, श्वास आणि आयुष्यरूपी दहा प्राणांचा जीवापासून वियोग करणे हिंसा आहे. म्हणून हिंसेला प्राणवध सांगितले आहे.
दुसऱ्यांना कष्ट देणे सुद्धा हिंसाच आहे
-
"तप्पज्जाय विणासो, दुक्खुप्पातो य संकिलेसोय ।
एस वहा जिण भणिओ वज्जेयत्वो पयत्तेणं"
शरीर पर्यायाचा नाश आणि दुःख व संक्लेश उत्पन्न करणे ह्यालासुद्धा तीर्थंकरांनी 'वध' असे सांगितले आहे. याचा प्रयत्नपूर्वक त्याग केला पाहिजे.