________________
(१९६)
आहे आणि कर्मच आरंभ आहे. तरी गृहस्थाने असे व्यापार करू नये की ज्यामुळे
पाप जास्त होते. कमी पाप घडेल अशाच व्यापाराने जीवन चालवावे. - आक्रमण करणाऱ्यांवर प्रती आक्रमणाद्वारे बलपूर्वक प्रतिरोध विरोधजा हिंसा रोजा हिंसा आहे.
गृहस्थ आपल्या रक्षणासाठी प्रतिआक्रमण करतो परंतु सर्वजण आपल्या मर्यादित दश राहायला शिकले तर आक्रमण, प्रतिआक्रमण करण्याची काहीच गरज राहणार नाही. प्रवृत्ती सुद्धा युद्धाला जन्म देते. शांती भंग करते.
संकल्पना हिंसा ज्या हिंसेचे मूळ कारण राग, द्वेष आणि प्रमाद आहे. जीविकेचा काहीच प्रश्न नसतो. ती संकल्पना हिंसा आहे. संकल्पजा हिंसेचा त्याग प्रत्येक व्यक्ती करू शकते. मनुष्य राग, द्वेष आणि आळस यामुळे व्यर्थ हिंसा करतो अशा अनावश्यक हिंसेपासून नेहमी दूर राहिले पाहिजे.
दुःख कोणालाच प्रिय नाही. एकेन्द्रियापासून पंचेन्द्रिय जीवापर्यंत कोणत्याही औराता अथवा संचित पदार्थाला स्वतः अथवा दुसऱ्यांद्वारे प्राणरहित करताना पाहून, तुकडे तुकडे करताना पाहून, लोह शृंखला अथवा बेडीने बांधताना पाहून, कान, नाक, शेपूट, दिन, हात, पाय, चामडे, नख इ. अंगोपांगांचे छेदनभेदन करताना, कत्तलखान्यात वध हैलाना पाहून, करुणापूर्ण आक्रंदन ऐकून, तडफडताना पाहून आनंद मानणे. "फार चांगले ते ह्याला मारायलाच पाहिजे होते, बंधन घालायलाच पाहिजे, ह्याला फासावर चढविले पाहिजे, बाचला असता तर गजब केले असते. मेला तर पृथ्वीचा भार कमी झाला इ. बोलणे, विचार करणे, हिंसानुबंधी भावना आहे.
ज्या वस्तूंच्या निर्मितीने, खाण्याने, उपभोगामुळे हिंसा होण्याची शक्यता आहे असे वचन बोलणे, विचारणेही हिंसानुबंधी भावना आहे.
मनुष्याला साधारणपणे सवय असते की हे महल, मंदिर, बंगला, दुकान, कोट किल्ला, माती अथवा दगडाची खेळणी, मूर्ती, भांडे, शिल्प इत्यादी किती सुंदर आहे ! पूर्ण शिल्पशास्त्री असेल. किती मनमोहक वस्तू बनविली आहे ! विहिर, नळ, तलाब किती सुंदर बनला आहे ! हे पाणी किती मधुर आहे !
कलाकार
किती सुंदर फवारे उडत आहेत ! चुली, भट्टी, इंजन कारखाना किती चागले आहेत ! चित्र, विचित्र विविध रंगांचे फटाकडे किती सुंदर आहेत ! वाजंत्रीचा आवाज किती मधुर आहे! ही सर्व भावना हिंसानुबंधी भावना अथवा विचार आहे.