________________
(१४२)
मनुष्य संसार आणि देव संसार असे चार प्रकारचे संसार सांगितले आहेत. ४९ ह्या चार आत्म्याच्या परिभ्रमणाच्या चार स्थिती आहेत, आत्मा जसे शुभाशुभ कर्म करतो त्यानुसार शुभाशुभ गतीमध्ये जन्म घेतो.
नंतर चतुर्गतीमध्ये परिभ्रमण करविणाऱ्या कर्मबंधनाची प्रत्येकी चार चार कारणे
दिली आहेत ५०
जसे 'नरकगती योग्य कर्मबंधन' याची चार कारणे (१) महाआरंभ, (२) महापरिग्रहः (३) पंचेंद्रिय प्राणीवध; (४) मांसाहार.
(१) मायाचार (२) शठता (३) असत्य
तिर्यच गतीला हेतुभूत चार कर्मे
बच्चन (४) कूट- तोल-माप (खोटे तोलभाप करणे)
मनुष्य गतीला हेतुभूत चार कर्मे (१) प्रकृतीची भद्रता (२) प्रकृतीची विनीतता (३) अनुकंपा (४) ईर्ष्यचा अभाव.
देवगतीला हेतुभूत चार कर्मे (१) सराग संयम, (२) संयमासंयम, (३) बालतप आणि (४) अकाम निर्जरा
ह्या संसार परिभ्रमणाच्या सोळा कारणांपैकी काही शब्द ऐकण्यास प्रिय वाटतात. (जसे मनुष्यगतीची चार कारणे तर चार गुणच आहेत. परंतु त्यांच्याबरोबर अज्ञान आणि मिथ्यात्व असल्याने ते संसार भ्रमणाला कारण होतात.
जर हीच कारणे सम्यक् दर्शनाशी संलग्न असतील तर ती मनुष्यगतीच काय तर मोक्षगतीची सुद्धा कारणे होऊ शकतात. परंतु ह्या गुणांमध्ये राग, अज्ञान, इत्यादी असल्याने यांची फलशक्ती कमी होते. म्हणून दयाळुता, सरलता ह्या गुणांचा त्याग करू नये, पण त्याचबरोबर असलेल्या अज्ञान आणि आसवतीचा भाव सोडून देणे म्हणजे त्या गतीच्या
कारणांचा त्याग समजावा.
ह्या सोळा कारणांचा त्याग करणे थोडक्यात आसवाच्या पाच कारणांचा अर्थात
कारण
मिध्यात्व, अव्रत, प्रमाद, कषाय आणि अशुभ योगाचा त्याग करणे आहे. तसेच पुढे विचार केला तर राग आणि द्वेषाच्या त्यागामध्ये सुद्धा ह्याचा समावेश होऊन जातो. राग आणि द्वेषच चतुर्गतीमध्ये परिभ्रमणाचे कारण आहे म्हणून ह्याचा त्यागच संसार परिभ्रमणाचा अंत आहे.
अशाप्रकारे चिंतन केल्याने, चिंतनात सतत राहिल्याने आत्मा परिणामतः संसारातून मुक्त होतो.