________________
(१५३)
HOHORE
विषिक भावना - 'किल्विष' शब्द निंदा, अवहेलना अथवा अवर्णवाद वा जोडलेला आहे. ज्ञानी, सर्वज्ञ, धर्माचार्य, धर्मसंघ, साधू या पाचांची जो रतो. अवर्णवाद बोलतो, मायापूर्ण आचरण करतो तो किल्विषिकी भावनेचे आचरण तो ९० ज्याच्या मनामध्ये असे विकृत चिंतन चालते तो पापाचारी आहे.
कि भावनेची काही अन्य कारणे दशवैकालिक सूत्रामध्ये सांगितली आहेत. - तपाची चोरी, व्रतस्वरूपी आचारांची चोरी करणारा किल्विषी देवामध्ये उत्पन्न
तपाची चोरी म्हणजे स्वतः तर तप करावयाचे नाही परंतु दुसऱ्या तपस्वींच्या जापाखाली तपस्वीच्या रूपात स्वतःची प्रशंसा करून घेणे अथवा कोणी विचारले की आपल्यामध्ये तपस्वी साधू कोण आहे ? तर अशा प्रश्नांवर मौन राहणे अथवा साधू तर तपस्वी असतातच असे भ्रमपूर्ण उत्तर देऊन तपस्वी नसतानादेखील लोकांमध्ये 'तपस्वी' नाव मिळविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तपाची चोरी करणे होय. याचप्रमाणे उत्कृष्ट प्रतादींचे आचरण न करूनदेखील उत्कृष्ट व्रती म्हणविऱ्याचे ढोंग करणे, विशिष्ट आचारसंपन्न नसताना देखील लोकांमध्ये उत्कृष्ट आचारसंपन्न विद्वान, उत्कृष्ट सेवाभावी असण्याचा अभिनय करणे म्हणजे मायाचार आहे. माया कपट करणाऱ्यालादेखील किल्विषिक भावनेच्या अंतर्गत मानले आहे.
आसुरी भावना - 'आसुरी' चा अर्थ 'राक्षस' आहे. ज्यांच्यात प्रशस्त, उत्तम कर्म, गुण आणि आचार नसतात अशा दुष्ट लोकांमध्ये राक्षसी भाव असतो. सदैव क्रोधाविष्ट राहणे आणि क्षुद्र स्वार्थासाठी निमित्त-ज्योतिषादी विद्येचा दुष्प्रयोग करणे म्हणजे आसुरी
भावना आहे.
तसे करणारे मानवच आहेत. परंतु त्यांची कार्ये असुर अर्थात राक्षसांसारखी असतात. तसे चिंतन केल्याने पापाच्या खोल खड्यात पडण्याची वेळ येते.
जो शांत झालेल्या विवादाला पुन्हा भडकावतो आणि अधर्मामध्ये आपली बुद्धी नष्ट करतो (कारण कलहामुळे शांती आणि सौम्यता नष्ट होते) अशा विग्रह, कलह करणाऱ्याला पापश्रमण म्हणतात. म्हणून क्रोध करू नये.
ह्या चार भावनांच्या उल्लेखानंतर ह्या अध्ययनामध्ये आणखी एक गाथा अशी ६, जो विशेषत्वाने मोहाचे भाव प्रकट करते. ह्या अध्ययनामध्ये 'मोह' शब्द तर आलेला
हाच भाव त्यात असल्याने व्याख्याकाराने ह्याचे 'संमोह भावने'च्या रूपात