________________
(१८२)
आजही सुगुरुचरित्र, गुणठाणा गीत हे ग्रंथही यांनी लिहिले आहेत.
बारा भावनांवर यांनी बेचाळीस श्लोकांची रचना केली आहे.
पंडित दीपचंदजी - हे आमेर जयपुरचे निवासी, कासलीवाल गोत्रीय, खंडेलवाल होते. ह्यांच्या ज्ञानदर्पण, अनुभव प्रकाश, परमात्मपुराण इत्यादी अनेक रचना आहेत. ह्यांचा साहित्य काळ १७७७ पासून मानला जातो.
बारा भावनांवर निश्चय नयाच्या दृष्टीने एका भावनेवर एका दोह्याची अत्यंत प्रेरक शब्दात रचना केली आहे.
कविवर बुधजनजी - यांचे दुसरे नाव 'बधीचंद' होते. ह्यांचा काळ सं. १८३३ आहे. हे जयपूरचे निवासी ‘खंडेलवाल ' जातीचे होते. यांच्या सं. १८२४ पासून १८९५ पर्यंतच्या सतरा रचना उपलब्ध आहेत. ह्यांचा 'बुधजनसतसई' नावाचा 'संग्रह ग्रंथ' आहे. यांच्या २६५ भजनांचे पदसंग्रह उपलब्ध आहेत.
बारा भावनांवर यांचे बारा दोहे आहेत.
पंडित दौलतरामजी यांचा जन्म जयपूरच्या जवळ असलेल्या 'वसवा' गावामध्ये झाला. हे खंडेलवाल जातीचे व कासलिवाल गोत्राचे होते. यांच्या घरासमोर जैन मंदिर असल्याने जैन तत्त्वावर ते नेहमी चर्चा करत होते. पुढे ते 'आग्रा' येथे गेले तेथे बनारसीदास नावाचे मोठे विद्वान होते. त्यांचे अनेक अनुयायी होते. पं. भूधरदास, पं. ऋषभदास इत्यादी. त्यातील ऋषभदास यांच्या उपदेशाने यांची जैनधर्माप्रती आस्था वाढली. त्यानंतर यांनी अनेक रचना केल्या आणि परमात्मप्रकाश इत्यादी अनेक ग्रंथावर हिंदी वचनिका सुद्धा लिहिल्या आहेत.
१८२७ मध्ये “पुरुषार्थसिद्धयुपाया'वर भाषा टीका लिहिली. ह्याशिवाय त्यांचे १२५ फुटकर पद्य उपलब्ध आहेत. हे 'दौलत संग्रह' या नावाने प्रसिद्ध आहे. यांच्या छ ढाळा नावाच्या पाचव्या ढाळेमध्ये बारा भावना आहेत. याचे कांजीस्वामींनी विवेचन केले आहे. हे 'वीतराग विज्ञान' या नावाने अनेक भागात प्रसिद्ध आहे.
पंडित जयचंद्र छाबडा - हे सुद्धा जयपुर निवासी खंडेलवाल जातींचे होते. सदासुखलाल आणि मुन्नालाल यांचे गुरू होते. हे कवी वृंदावनांचे समकालीन होते. वि. सं. १८६१ मध्ये यांनी सर्वार्थसिद्धी राजवार्तिक आणि श्लोकवार्तिकाच्या आधारावर वचनिका लिहिली. वि. सं. १८६६ मध्ये कार्तिकेयानुप्रेक्षेची वचनिका लिहिली. अमृतचंद्राचार्याच्या