________________
(१८३)
aaiiseasonsisailentCSTRIANIMAस मानता
मख्याती टीकेचर असलेली
भरलेली 'आत्मख्याती समयसार वचनिका' आणि कलश याचे तर आहे. ती वि. सं. १८६४ मध्ये लिहिली.
भनेक ग्रंथांच्या वचनिका सुद्धा लिहिल्या तसेच भाषांतरही केले. यांनी बारा जनांबर बारा श्लोक लिहिले, जे मुमुक्षुला मोहवून टाकतात.
पंडित भागचंद्र - यांनी 'उपदेश सिद्धांतमाला' याचे वि. सं. १९१२ मध्ये
मिनाथ पुराणांचे' १९०७ मध्ये भाषांतर केले. अशा अन्य अनेक ग्रंथांचे सुद्धा अपांतर केले. यांच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत.
बारा भावनांवर केवळ चार गाथांमध्ये यांनी रचना केली. ही रचना जणूकाही पानरांमध्ये सागर भरण्याचेच कार्य आहे.
आचार्य आत्मारामजी - हे श्रमण संघाचे पहिले पट्टधर होते. त्यांनी भावनायोग ग्रंथामध्ये बारा भावना आणि परिशिष्ट रूपात मैत्री इत्यादी चार भावनांचा समावेश केला
He पंडित रत्नचंद्रजी - श्वेतांबर स्थानकवासी परंपरेचे विद्वान, शतावधानी, भारतभूषण श्री रत्नचंद्रजी महाराजांची संस्कृत अध्ययनातील विद्वत्ता त्याकाळच्या आधुनिक विद्वानांमध्ये अत्यंत उच्च कोटिची होती. कच्छच्या 'भोरा' गावामध्ये दीक्षा घेऊन यांनी जैन आगमांचे अध्ययन केले. ह्यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते. यांची लेखन शक्ती आणि विचार शक्ती इतकी प्रबळ होती की त्यांनी आगम अध्ययनाच्या सविधेसाठी "जैनागम शब्दकोश' आणि विद्वानांच्या अध्ययन वृद्धीसाठी "अर्धमागधी कोश' लिहिले. "कर्तव्य कौमुदी' आणि "भावना शतक' यांची उत्कृष्ट रचना आहे.
भावनाशतकामध्ये बारा भावनांचे विस्तृत विवेचन आहे. प्रत्येक भावनेला समजण्यासाठी एकेका अष्टकामध्ये आठ-आठ श्लोकांची रचना केली आणि उपसंहाराच्या रूपात थोड्या श्लोकांची रचना केली. अशाप्रकारे शंभर श्लोक पूर्ण केले. ह्या श्लोकांची रचना संस्कृतमध्ये आहे. ह्या श्लोकांची भाषा आणि त्यातील भावना ही हृदयात स्फूर्ती निर्माण करते. याची अनेक संस्करणे निघालेली आहेत. हे ह्या ग्रंथाच्या लोकप्रियतेचेच द्योतक आहे. यांचे हिंदी पद्यानुवाद श्री मूलचंदजी वत्सल यांनी केले आहे. तसेच ह्याचे गुजराती भाषांतर सुद्धा झाले आहे. ह्याचे महत्त्व जाणून विदेशी लोकांच्या भावनेमुळे ‘डॉ. अमृतचंद्र गोपानी' यांनी ह्या भावना शतकाचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले आहे. याचे संपादन 'डॉ. धर्मशीलाजी महासतीजी' यांनी केले आहे.