________________
(१८४)
अनदान जेठमल सेठिया - यांनी चव्वेचाळीस दोह्यांमध्ये बारा भावनांची रचना के यांचे 'आत्महितबोध भावना की दोहावली' या नावाने पुस्तक प्रकाशित झाले यात बारा भावनांबरोबर मैत्री इत्यादी चार भावनांचेसुद्धा विवेचन केले आहे.
पन्यास भक्तिविजयगणी - यांचा जन्म १९३० मध्ये झाला. यांचे भावना' नावाचे पुस्तक वि. सं. १९७२ मध्ये प्रकाशित झाले. ह्यामध्ये ठिकठिकाणी अनित्यादी भावनेचे वर्णन आहे.
बारा भावनांवर यांनी एक 'गहुली' सुद्धा रचना केली आहे. ही गुजरातमधील अत्यंत सुंदर रचना आहे.
___ हे श्वेतांबर मूर्तिपूजक परंपरेचे महान उपाध्याय होते. भवसागरातील जीवांच्या हितासाठी यांनी वैराग्यभावनेची रचना केली.
मुनी श्री गणेशमलजी - हे श्वेतांबर तेरापंथी संप्रदायाचे विद्वान संत होते. यांचा जन्म गंगाशहरामध्ये सं. १९६६ मध्ये झाला. यांनी दोहा छंदामध्ये अनेक रचना केल्या. हा अपभ्रंशाचा आवडता छंद आहे.
यांनी सोळा भावनांवर ‘भावनाबोध' नामक पद्यमय रचना केली आहे. ही रचना पण दोहा छंदामध्येच आहे.
नगीनदास गिरधरलाल सेठ - 'गुजरात' जैन धर्माचे हजारो वर्षांपासून मुख्य केंद्र आहे. सम्राट अशोकाचा नातू (पौत्र) 'महाराजा संप्रती' यांना पश्चिम भारतामध्ये जैन धर्माचा प्रचार, प्रसार करण्याचे श्रेय आहे. ज्याप्रमाणे सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी देश विदेशामध्ये प्रचारक पाठवले. त्याचप्रमाणे यांनी सुद्धा जैन धर्माच्या प्रसारासाठी सुयोग्य लोकांना पाठविले. गुजरातमध्ये अनेक संतांच्या प्रेरणेने आणि प्रयत्नांनी जैन धर्माचा प्रसार झाला. त्यांच्याबरोबर मोठमोठ्या विद्वान आणि गृहस्थ लेखकांनी सुद्धा विभिन्न धार्मिक विषयावर आपले लेखनकार्य केले. एकोणिसाव्या शतकाच्या गुजराती लेखकांमध्ये 'नगिनदास सेठ' यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. यांचा आगम आणि सिद्धांत याचा गाढा अभ्यास होता...
यांनी भावनेवर एक पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये प्रत्येक भावनेच्या सुरुवातीला त्या त्या भावनेसंबंधी आगमातील गाथा देऊन विवेचन केले आहे. गाथा आधाररूप असल्या तरी त्याचे विवेचन त्यांच्या स्वतःच्या चिंतनावर आधारीत आहे. भावनेचे सखोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयोगी आहे.