________________
(१६३)
वर्णन केलेले आहे. तसेच विशेषरूपाने हे सांगितले आहे की ह्या चारांचे शरण पुरुषालाच प्राप्त होते. यापुढे असेही सांगितले आहे की, ज्यांनी ह्या चारांचे घेतले नाही, दान, शील, तप भावनारूप धर्माचा स्वीकार केला नाही, चतुर्गतिरूप भाचा विच्छेद केला नाही ते पुरुष मनुष्यजन्म प्राप्त करूनसुद्धा अयशस्वी झाले आहेत, त्याचे जीवन व्यर्थ गेले आहे. १०७
बारा भावनांमध्ये दुसरी 'अशरण भावना' आहे. त्यात असे सांगितले आहे की मात कोणतीच वस्तू शरणरूप नाही. फक्त उपरोक्त चार शरणच शरणरूप आहेत.
दुसऱ्या 'आतुरप्रत्याख्यान' प्रकीर्णकामध्ये एकत्व भावनेचा उल्लेख झाला आहे. अथात असे लिहिले आहे की जीव एकटाच जातो, निश्चितपणे एकटाच उत्पन्न होतो, एकटाच मरतो आणि कर्मरहित झाल्यावर एकटाच सिद्ध होतो. ज्ञानदर्शनासहित माझा आत्माच शाश्वत आहे. अन्य सर्व बाह्य पदार्थ केवल संबंधमात्र आहेत. १०८
तिसऱ्या महाप्रत्याख्यान प्रकीर्णकामध्येसुद्धा एकत्व भावनेचे असेच वर्णन केलेले
आहे. १०९
चौथ्या 'तंदुलवैचारीक' प्रकीर्णकामध्ये अनित्य भावना आणि अशुची भावना त्याचे वर्णन प्राप्त होते. त्याचे विवेचन करताना लिहिले आहे की हे शरीर अध्रुव, अनित्य, अशाश्वत, वृद्धी आणि क्षती प्राप्त होणारे विनाशशील आहे. त्याला आधी किंवा नंतर अवश्यच सोडावे लागणार आहे.
त्यानंतर ह्यातच शरीराच्या संरचनेचे विस्तृत विवेचन केलेले आहे. शरीराच्या अशुचितेचे वर्णन करताना लिहिले आहे की, जर शरीराच्या आतील मांस परिवर्तित करून बाहेर काढले तर त्याची अशुची पाहून मातासुद्धा घृणा करू लागेल. मनुष्यशरीर मांस, शुक्र, हाडे, इत्यादींनी व्याप्त असल्याने अपवित्र आहे. परंतु वस्त्र, गंध आणि माल्यादीने आच्छादित असल्याने सुशोभित दिसते. हे शरीर कवटी, चरबी, मांस, हाडे, रक्त, चामडे, कोश, नाकाचा मळ आणि विष्ठा इत्यादींचे घर आहे. ओठांच्या चहुकडे लाळेचा चिकटपणा, मुख घामाने व्याप्त असून, दात मलिन आहेत.
ह्या शरीराच्या खांद्याची नस, अनेक शिरा आणि अनेक सांध्यानी बद्ध आहे. केसाने आच्छादित अशोभनीय कटीप्रदेश, रोमकूपातून स्वभावतः अपवित्र आणि दुर्गंधयुक्त निघणारा घाम, त्यातील काळीज, आतडे, पित्ताशय, हृदय, फुप्फुसे प्लिहा इत्यादी मलस्त्रीबक नऊ छिद्रे आहेत. ती दुर्गंधयुक्त पित्त, कफ, मूत्र इत्यादींचे निवासस्थान आहे.