________________
(१७२)
समयसार', 'प्रवचनसार' आणि 'पंचस्तिकाय' हे तीन ग्रंथ अत्यंत प्रसिद्ध यांनी प्राभूतांची सुद्धा रचना केली. परंतु त्यातील केवळ आठ प्राभृतेच आज
उपलब्ध आहेत.
त्यातील 'भाव प्राभृत' आणि 'चारित्रप्राभृतामध्ये भावनेचे सुंदर वर्णन झालेले वारा भावनांविषयी "वारसाणुवेक्खा'' नामक स्वतंत्र ग्रंथाची रचना, ही त्यांची एक महत्वपर्ण कृती आहे. त्यात 'एक्क्याणव' गाथा आहेत.
_ कुंदकुंदाचार्यांची पूजनीयता आणि गौरवपूर्ण स्थानाचे माहात्म्य खालील मंगलमय लोकातून सिद्ध होते.
मंगलं भगवान वीरो, मंगलं गौतम गणी
मंगलं कुंदकुंदार्यो जैन धर्मोऽस्तु मंगलं ।। ह्या श्लोकानुसार गणधर गौतमस्वामींनंतर कुंदकुंदाचार्यांचे स्थान मानले आहे. ह्यांची कुंदकुंद, वक्रग्रीव, एलाचार्य, गृद्धपृच्छ आणि पदानंदी अशी पाच नावे होती. असे सांगितले जाते की हे महाविदेह क्षेत्रात सीमंधरस्वामींच्या समवसरणामध्ये सुद्धा गेले होते. ह्यांच्या साहित्यातून साधकाला आत्मबोधाची प्रेरणा मिळते.
। आचार्य उमास्वाती - महान श्रृतधर, जैन शासनाचे पवित्र स्तंभ, विद्वानशिरोमणी 'आचार्य उमास्वाती' यांचा काळ विक्रम संवत्सर प्रथम शताब्दी ते तिसरी शताब्दी यांच्या दरम्यान मानला जातो. यांनी सर्वप्रथम जैन वाङ्मयाला संस्कृत सूत्रामध्ये निबद्ध करून सूत्रात्मक शैलीमध्ये 'तत्त्वार्थसूत्र' याची रचना केली. जैन साहित्यात ह्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे. ह्यात जैनधर्माच्या मौलिक सिद्धांतांचे थोडक्यात निरूपण
केलेले आहे.
अन्य धर्मांमध्ये गीता, कुराण आणि बायबल यांचे जे स्थान आहे तेच स्थान जैन धर्मात तत्त्वार्थसूत्राचे आहे. आचार्य उमास्वाती यांच्या 'तत्त्वार्थसूत्राची' ही विशेषता आहे की दिगंबर आणि श्वेतांबर हे दोन्ही पंथ ह्याचा सारखाच आदर करतात. दोन्ही परंपरेच्या आचार्यांनी ह्यावर टीका रचल्या आहेत. त्यात आचार्य पूज्यपाद यांची 'सर्वार्थसिद्धी' अकलंकदेव यांचे 'तत्त्वार्थराजवार्तिक' आणि विद्यानंदींचे 'तत्त्वार्थश्लोक वार्तिक' उल्लेखनीय आहे. स्वतः उमास्वाती यांनी 'तत्त्वार्थभाष्य' लिहिले आहे. ज्याचा उद्देश सूत्रात वर्णित सिद्धांतांचे स्पष्टीकरण करण्याचा आहे. स्वतः ग्रंथकाराने केलेल्या व्याख्येची एक वेगळीच विशेषता असते कारण त्या तत्त्वांचा त्यांना साक्षात परिचय असतो.