________________
(१४६)
तीही व्यक्ती रक्षण करण्यात समर्थ नाही.६०
नाच्या आठव्या अध्ययनामध्ये कपिलमुनी चोरांना उपदेश देताना सांगतात की, संसार अध्रुव, अशाश्वत आणि प्रचुर दुःखाने भरलेला आहे. आधी-व्याधी-उपाधीरूपी साची अत्यधिक प्रचुरता आहे. संसाराचे कोणते कर्म असे आहे की ज्यामुळे जीव, मा इत्यादी दुर्गतीमध्ये जात नाही ? अर्थात संसारातील सर्वच अनुष्ठाने दुर्गतिदायक आहेत. अनित्य आणि अशाश्वत आहेत.६१
या अध्ययनात पुढे बोधी दुर्लभतेचे वर्णन प्रस्तुत केलेले आहे. 'बोधी' अर्थात या जन्मातही सम्यक् ज्ञान, दर्शन आणि चारित्र्यरूपी धर्माची प्राप्ती होणे.'६२
उत्तराध्ययनसूत्र भगवान महावीरांची अंतिम देशना आहे. ह्याच्या अंतर्गत साधकाला मोक्षमार्ग दाखविण्याच्या हेतूने तत्त्वज्ञान दृष्टांतादीद्वारे सुद्धा भावनेचे सरळ भाषेमध्ये निरूपण झाले आहे. ह्याच्या नवव्या अध्ययनामध्ये नमीराजाद्वारे एकत्व भावनेच्या चिंतनाचे अत्यंत सुंदर वर्णन आहे. "जो साधक सर्व प्रकारच्या बाह्य आणि आभ्यंतर दधनातून मुक्त होऊन मी एकटाच आहे, माझे कोणीच नाही अशाप्रकारे चिंतन करतो आणि भिक्षेद्वारा जीवननिर्वाह करतो त्या गृहत्यागी साधू चे जीवन निश्चितच कल्याणकारी व सुखप्रद आहे.६३
एकत्व भावनेचा चिंतक विचार करतो की प्राणी एकटाच जन्म घेतो, एकटाच मरतो. नमीराजाला सांसारिक पदार्थाविषयी किंचितही मोह, ममत्व नव्हते. त्याच्यामुळे त्याच आत्मचिंतन व एकत्व भावनेचे चिंतन इतके उत्कष्ट होते की परीक्षा घेण्यासाठी देवलोकामधून आलेले इंद्रदेखील त्याच्या त्यागासमोर नतमस्तक झाले.
नमीराजाला ज्या घटनेने एकत्व चिंतनाची प्रेरणा मिळाली तो प्रसंग थोडक्यात असा - एकदा नमीराजाच्या शरीरामध्ये दाहज्वर उत्पन्न झाला. अनेक वैद्यांनी औषधोपचार कले. तेव्हा एका वैद्याने नमीराजाच्या शरीरावर चंदनाचा लेप लावण्याचे सूचित केले. माराजाच्या हजार राण्या चंदन घासू लागल्या. चंदन घासले जात होते. परंतु राण्यांच्या हातातल्या कंकणाच्या आवाजाने नमीराजा उद्विग्न झाला. त्याने मंत्र्याकडून आवाज बंद सरण्याची सूचना दिली. राण्यांनी सौभाग्यरूप एक-एक कंकण हातात ठेऊन बाकीची सकणे काढून टाकली. आवाज बंद झाला. नमी राजाने मंत्र्याला विचारले, 'काय
बद कल का ?' त्यावर मंत्री म्हणाला. 'राजेश्वर चंदन घासले जात आहे. तुमच्या समजुतदार राण्यांनी सौभाग्य चिन्ह म्हणून केवळ एक कंकण हातात ठेऊन
चंदन घासणे बंद केले का ?' त्यावर मत्रा में
KANADATTA