________________
(१४५)
प्रश्नव्याकरण सूत्र
आचारांग आणि समवायांग सूत्राप्रमाणे ह्याच्या संवरद्वारामध्ये पाच महाव्रतांच्या भावनांचे वर्णन आहे. ह्या तिन्ही आगमांमध्ये ह्या भावना जवळ-जवल सारख्याच आहेत. थोडाफार क्रम मागे पुढे आहे आणि शाब्दिक भेदही आहे, पण प्रतिपाद्य विषयात काही विशेष फरक नाही. ५५
औपपत्तिक सूत्र
ह्याच्या चतुर्थ ‘ध्यान’नामक अध्ययनामध्ये स्थानांक आणि भगवतीप्रमाणे धर्मध्यानाच्या चार अनुप्रेक्षांचे वर्णन आहे. ५६ वैषयिक सुख किंपाक फळाप्रमाणे असार आहे. जीवन पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे अथवा कुशाग्रावर असलेल्या जलबिंदूप्रमाणे चंचल आहे, असे जाणून ज्ञानी जन संसारातील हिरण्य, सुवर्ण इ. बहुमूल्य पदार्थ आणि वैभवादीला कपड्यावर लागलेल्या धुळीप्रमाणे झटकून अर्थात परित्याग करून प्रव्रजित होत राहतात. ५७
उत्तराध्यन सूत्र
उत्तराध्यन सूत्रातील चतुर्थ अध्ययनाची सुरूवात अनित्य आणि अशरण भावनेच्या उद्घोषाने झाली आहे. त्यात लिहिले आहे, हे जीवन संस्काररहित आहे. म्हणजे एकदा तुटल्यावर पुन्हा जोडले जात नाही. म्हणून प्रमाद करू नका. कारण वार्धक्य प्राप्त झाल्यावर व्यक्तीचा निश्चितच कोणीही रक्षणकर्ता नसतो. अशाप्रकारे विचार केला पाहिजे की हिंसा करणारे, पापस्थानापासून निवृत्त न होणारे प्रमादी पुरुष शेवटी कोणाला शरण
जातील? ५८
ह्या गाथेमध्ये आयुष्याची दोरी तुटल्यावर त्याला कोणीही जोडू शकत नाही आणि जन्म, जरा, मृत्यूमध्ये कोणीच शरणरूप होऊ शकत नाही, या संदर्भात स्पष्ट विवेचन आले आहे.
सहाव्या अध्ययनामध्ये साधकाला उपदेश करताना सांगितले आहे की, जर तुम्ही पंडित असाल तर पाशाची-बंधनाची समीक्षा करून सत्याचा शोध करा आणि जगातल्या सर्व प्राण्यांबरोबर मैत्री भावनेचा संकल्प करा. इथे मैत्री भावनेचे वर्णन आहे.५९
परंतु कुटुंबियांबरोबर मैत्री करून इतका लाभ होत नाही. येथे विश्वप्रेमाची जरुरी आहे. मनुष्य स्वार्थांधतेने स्वजनांशी प्रेम करतो. शास्त्रकार पुढे असे सांगतात की, 'जो पंडित आहे तो सतत चिंतन करतो की दुःख प्राप्त झाल्यावर आई-वडिल इत्यादी कुटुंबातील