________________
ले आहेत व मी त्यांचा आहे. परंतु कोणीच कोणाचा रक्षणकर्ता नाही आणि पही नाही. दुःख आल्यावर मनुष्य एकाटाच ते भोगतो, मृत्यू आल्यावर जीव एकटाच अभियामध्ये जातो. म्हणून ज्ञानी पुरुष कोणालाच शरण मानत नाही.४४
अज्ञानी जीच मूढतेमुळे, ममत्वामुळे व्यर्थच ह्यांना शरणरूप मानतात. या मध्ये एकत्व आणि अशरण अशा दोन भावनांचा उल्लेख आला आहे.
पंधराव्या अध्ययनामध्ये बोधिदुर्लभतेचे वर्णन करताना लिहिले आहे की, जो बना मनुष्य जन्मात भ्रष्ट होतो त्याला पुन्हा जन्मजन्मांतरात मनुष्यजन्म लवकर मिळत आणि मनुष्य जन्माशिवाय संबोधी म्हणजे सम्यक दृष्टीची प्राप्ती होणे अत्यंत दुर्लभ
अशी लेश्या किंवा चित्तवृत्ती किंवा भावसुद्धा मिळणे दुर्लभ आहेत, जे व्यक्तीला धनराधनेबरोबर जोडतात.४५
सांगण्याचे तात्पर्य हे आहे की, जो मनुष्य जन्म मिळाल्यानंतरही व्यर्थ घालवितो, से मनुष्य जन्मात धर्माचे बी पेरत नाही त्यांना मोक्षप्राप्ती सुलभ नाही. जे सम्यक् दृष्टी संपन्न होऊन धर्माचरण करतात त्यांनाच मोक्ष प्राप्त होतो. अन्यत्वभावनेचे भाव पण पाच्यात दिसून येतात. “त्यात लिहिले आहे" कामभोग माझ्यापासून भिन्न आहे आणि मी मामभोगाने भिन्न आहे, पदार्थ भिन्न आहे व मी त्याच्याने भिन्न आहे.४६
स्थानांग सूत्र स्थानांग सूत्राच्या चतुर्थ स्थानामध्ये जेथे चार ध्यानांचे विवेचन आहे, तेथे (१) रकत्वानुप्रेक्षा (२) अनित्यानुप्रेक्षा (३) अशरणानुप्रेक्षा (४) संसारानुप्रेक्षा यांच्या रूपात भार अनुप्रेक्षेचा उल्लेख झाला आहे. ह्या अनुप्रेक्षेच्या अभ्यासाने धर्मध्यानामध्ये स्थिरता यत. द्वादश भावनेतल्या एकत्व, अनित्य, अशरण आणि संसार भावनेबरोबर ह्यांची कल्यता आहे.१७
। स्थानांग सूत्रामध्ये संसाराचे चार प्रकार सांगितले आहेत - द्रव्यसंसार, क्षेत्रसंसार, कालसंसार आणि भावसंसार.४८
व्यससार चतुर्गतिरूप आहे. आगमामध्ये 'चाउरंत संसार कंतोर' शब्द पुन्हा उल आला आहे. ज्याचा अर्थ असा आहे की ज्या संसाररूपी अरण्याचे चतुर्गतिरूपी का अंतिम किनारे आहेत तो संसार 'कंतार' आहे.
स्थानांग सूत्रामध्ये त्यानंतरच्या दुसऱ्या उद्देशकामध्ये नरकसंसार, तिर्यंच संसार,