________________
(१३८)
निर्ग्रन्थ आपल्या शांतीमय चारित्र्याला नष्ट करतो. असे होऊ नये म्हणून निग्रन्थाने ही रसनेन्द्रिय संवर भावनेचे चिंतन केले पाहिजे. ३३
आस्वादेन्द्रिय अथवा जिव्हा अशी आहे की ती साधकाला आध्यात्मिक आनंदापासून विन्मुख करते. जो स्वादिष्ट पदार्थांच्याप्रती मोहासवत रहातो त्याचे मन विकारयुक्त बनते. तशा पदार्थांप्रती असलेली त्याची आसवती त्याला पवित्र चर्येपासून दूर करते. तो सुखप्रद, पुष्टिप्रद, खाद्य, पेय इत्यादी पदार्थांनी मोहित होतो. साधनेच्या ति हे सर्वाधिक मोठे विघ्न आहे. ह्याला नष्ट केल्याशिवाय जीवनामधील मोठा अडथळा दूर होणार नाही. आपल्या व्रतमय मार्गापासून विचलित होण्याची शंका उत्पन्न होते. म्हणून साधकाने ही भावना अंगिकारली पाहिजे. वारंवार असा विचार केला पाहिजे की जीभेचा स्वाद आध्यामिक उन्नतीमध्ये बाधक आहे. परिग्रहाचा हेतू आहे म्हणून स्वादत्यागाच्या भावनेचे वारंवार चिंतन करणे लाभदायक आहे.
Mchasing
५) स्पर्शेन्द्रिय संवर भावना - स्पर्शेन्द्रियाद्वारे जीव मनोज्ञ, अमनोज्ञ स्पर्शचा अनुभव करतो. पण निर्ग्रन्थ भिक्षू त्या स्पर्शामध्ये आसक्त, मोहित न होता आणि राग, द्वेष न करता आत्मभावामध्ये लीन राहतो. परंतु जो भिक्षू ह्या विषयामध्ये आसक्त होतो तो निर्ग्रन्थ नाही असे सर्वज्ञ प्रभू म्हणतात.
३४
स्पर्शेन्द्रियाद्वारेही अंत:करणामध्ये शुभाशुभ भाव येतात. मोह आणि राग उत्पन्न होतो. भौतिक अनुकूल आणि प्रिय स्पर्शामुळे मनामध्ये असे भाव उठतात ज्यामुळे व्रतमय जीवनाची स्थिरता नष्ट होते. कारण मोह, माया भौतिक कामनेला पूरक आहेत. त्या दिशेने साधकाच्या मनात आसक्ती भाव उत्पन्न होतो. म्हणून प्रिय अप्रिय स्पर्शाने समत्वयुक्त उनमें साधकासाठी आवश्यक आहे.
जसे प्रारंभी सांगितले आहे की पाच महाव्रतांचे अखंडरूपाने पालन करण्यासाठी अपेक्षित शक्ती ह्या भावनेमुळे वाढते. साधकाचे मनोबळ वाढते. त्याच्यात अभिनव आत्मस्फूर्ती जागृत होते.
पाच महाव्रते म्हणजे आत्मशुद्धीची साधना. हा हिमगिरीचा उंच, सरळ चढाचा आहे. संपूर्ण उत्साहपूर्वक आणि अत्यंत सावधान होऊन चढणाराही कधी कधी खाली पडू लागतो. परंतु घायाळ झालेला आरोहक जर पुन्हा उत्साहाने चढण्याचा पुरुषार्थ करत असेल तर आत्मशुद्धीच्या भावनेच्या पर्वतावर चढता चढता पडणाऱ्या साधकाने निराश न होता पुन्हा आरोहण सुरू केले पाहिजे.