________________
(१३७)
ह्या भावनेच्या अभ्यासाद्वारे श्रोत्रेन्द्रियांना संस्कारित करतो तो अनुकूल, भौतिक, समय, प्रिय शब्द ऐकण्याची लालसा नष्ट करतो, प्रतिकूल अप्रिय शब्द ऐकून तो विचलित होत नाही आणि परिग्रहमय जगामध्ये आसक्त न राहता अपरिग्रहाच्या साधनेमध्ये सफल
चक्षुरिन्द्रियांच्या मनोज्ञ आणि अमनोज्ञ २) चक्षुरिन्द्रिय संवर भावना विषयामध्ये राग, द्वेष न करणे अशी दुसरी भावना आहे. ३१ 'चक्षु' म्हणजे 'डोळा'. याचा संबंध मूर्त पदार्थाबरोबर आहे. जे पदार्थ प्राण्यांच्या आकांक्षाना पूर्ण करतात ते त्यांना प्रिय बाटत वाटतात आणि ज्या पदार्थांनी त्यांची अभिलाषा पूर्ण होत नाही किंवा जे स्यांच्या इच्छापूर्तीमध्ये अवरोधक बनतात त्यांना ते अप्रिय मानतात. दोन्ही प्रकारचे पदार्थ अच्छा त्यांच्या डोळ्यासमोर येतात तेव्हा त्यांची प्रतिक्रिया आकर्षण, राग, द्वेषाचे रूप भरण करते. आकर्षणाचे फळ त्या पदार्थामध्ये आसक्त होण्याचे आहे. असे झाले असता परिणामतः त्याचे ध्यान स्वतःच्या वस्तू सोडून दुसऱ्यांच्या वस्तूंकडे वेधले जाते. तसे होऊ नये म्हणून ह्या भावनेचा निरंतर अभ्यास करणे आवश्यक आहे. परिणामतः साधकाची मूर्त पदार्थमय जगात आसक्ती राहत नाही व पदार्थांचे आकर्षण नष्ट होते.
३) घ्राणेन्द्रिय संवर भावना
'घ्राणेन्द्रिय' अर्थात 'नाक'. त्याचा स्वभाव सुगंध, दुर्गंधाचे ज्ञान ग्रहण करणे हे आहे. घ्राणेन्द्रियांच्या मनोज्ञ, अमनोज्ञ विषयामध्ये राग, द्वेष न करता निर्ग्रन्थाने समभाव ठेवला पाहिजे. निर्ग्रन्थ भिक्षूने मनोज्ञ गंध प्राप्त होता आसक्त होता कामा नये. त्यांच्यात गुरफटणारा साधक आत्मभावापासून भ्रष्ट होतो. तो शांतीरूप चारित्र्याचा नाश करतो. शांतीरूप चारित्र्याचा भंग होऊ नये आणि केवली भाषित धर्मापासून भ्रष्ट होऊ नये म्हणून घ्राणेन्द्रिय संवर भावनेचे पुन्हा पुन्हा चिंतन केले
पाहिजे ३२
जसे शब्द, रूप यांच्या आकर्षणाशी अथवा मोहाशी परिग्रह जोडलेला आहे, तसेच घ्राणेन्दियांद्वारे ग्रहित सूरभी, असूरभी पदार्थानेही मानवाच्या मनात बाह्यरूपाने प्रिय वाटणाऱ्या पदार्थांच्या प्रती ममत्व भावना वाढते. म्हणून अशा पदार्थांपासून अप्रभावित - अनाकृष्ट राहण्याच्या भावनेचा निरंतर अभ्यास केल्याने अपरिग्रह महाव्रताच्या आराधनेला बळ प्राप्त होते.
४) रसनेन्द्रिय संवर भावना जीभेद्वारे मनोज्ञ रसाच्या आस्वादनाने जो आसक्त होऊन रागाविष्ट होतो आणि अमनोज्ञ रसास्वादाने दुःखी होऊन द्वेषाविष्ट होतो,
-