________________
(१३३)
कडून परिग्रहण करणे आवश्यक आहे. साधू तर आपल्या चर्चेमध्येच राहतात. परंतु त्यासाठी तसेच वातावरणसुद्धा प्राप्त व्हावयास हवे, ज्यामुळे त्यांची चर्या पवित्र बहिन घेणारा आणि देणारा जेव्हा जागृत असतो तेव्हा प्रमाद होण्याची शक्यता नसत. साधकाच्या मनामध्ये अशाप्रकारे कर्तव्यबोध असणे आवश्यक आहे. तसेच ह्या भावनेने युक्त ग्रहण्याचा अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे अदत्तदान महाव्रतामध्ये दोष लागण्याची
आशंका राहणार नाही.
आत्मा बाह्य पदार्थाने सर्वथा निर्लिप्त राहावा हे संयमी जीवनााठी अत्यंत आवश्यक आहे. साधूने पदोपदी जागृत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आत्मेतर पदार्थांबद्दल त्याच्या मनामध्ये कधीच आसक्ती उत्पन्न होऊ नये यासाठी अचौर्य महाव्रताच्या पाच भावनांमध्ये विशिष्ट जोर देऊन सांगितले आहे की साधूला जेथे अवग्रह स्वीकारण्याची जी असेल तेथे सावधानपणे अवग्रह ग्रहण करावे. जैन धर्मामध्ये आचरणाची पवित्रता आणि भावनेची शुद्धता यावरच भर दिलेला आहे.
चतुर्थ महाव्रताच्या पाच भावना
ह्या भावनेमध्ये निर्ग्रन्थ साधू स्त्रियांविषयी (१) स्त्री कथा वर्जनरूप भावना ह्या भावनेमध्ये निर्ग्रन्थ शांतीरूपी कथा न ऐकण्याचे चिंतन करतो. कारण पुन्हा पुन्हा वीकथा करणारा साधू चरित्राचा आणि ब्रह्मचर्याचा भंग करणारा होतो. तो केवळी प्ररूपित सर्वज्ञदेवाने सांगितलेल्या धर्मापासून भ्रष्ट होतो. २४
-
म्हणून स्त्रीराग कथेचे श्रवण, चिंतन आणि कीर्तन ब्रह्मचारी साधकाने कधीच करू नये. परिणामतः वासनेचे विष त्याच्या मनामध्ये पसरत नाही व तो कामविजयी बनतो.
२) स्त्री मनोहर अंग अवलोकन त्यागरूपभावना - निर्ग्रन्थ साधूने कामभावनेने त्रियांच्या मनोहर इंद्रियांचे सामान्यपणे अथवा विशेषतेने निरीक्षण करू नये, किंवा कामपूर्ण दृष्टिक्षेप सुद्धा टाकू नये. सर्वज्ञ प्रभू सांगतात की, जो साधक अशाप्रकारे कामपूर्ण दृष्टीने स्त्रियांच्या शरीराचे निरीक्षण करतो तो शांतीरूपी चरित्राचा, ब्रह्मचर्येचा नाश करतो. २५ म्हणून कामावर विजयी होण्यासाठी साधकाने आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवले पाहिजे.
कामविजयी बनणे फार कठीण आहे. मनात विकार नसतानाही प्रत्यक्ष तशी स्थिती उत्पन्न झाल्यावर मन बिकारयुक्त होऊ शकते. म्हणून साधूने स्त्रियांच्या शरीराकडे पाहून आपले चारित्र्य दूषित करू नये. साधूच्या मनात सहसा विकृती उत्पन्न होत नाही.