________________
करणारी व्यक्ती असत्यही बोलते. म्हणून हास्याचे अनिष्ट स्वरूप 10
न त्याचा त्याग करणाराच निर्ग्रन्थ आहे.१८
सापसुद्धा एक मनुष्यच आहे. कधी कधी तेसुद्धा चेष्टामस्करी करू लागतात. -अजित्यामध्ये बोलण्याचे ध्यान राहत नाही, तेव्हा असत्य बोलण्याचीही चूक होऊ
सापासन वाचण्यासाठी नेहमी असे चिंतन केले पाहिजे की, हास्य परिहास्याच्या जमाने माझे सत्यव्रत भग्न होऊ शकते. म्हणून तसे न होण्यासाठी नेहमी जागृत राहिले र नेहमी वाणीला संयमित आणि गंभीर ठेवली पाहिजे. असे संस्कार झाल्याने
शाच्या जीवनामध्ये सत्य महाव्रत साकार होते. तो निर्दोष आणि अखंडरूपाने सत्याची आराधना करता करता जिनवाणीची खरी उपासना करू शकतो. आपल्या जीवनाच्या खऱ्या ध्यापर्यंत पोहचू शकतो. सर्वात अंतिम ध्येय 'मोक्ष' हे सुद्धा प्राप्त करू शकतो.
। अचौर्य महाव्रताच्या पाच भावना १) अनुवीची मितावग्रह याचना - जो साधक प्रथम विचार करून परिमित स्वग्रहाची याचना करतो तो निर्ग्रन्थ आहे. जो विचार केल्याशिवाय अवग्रह ग्रहण करतो, तो अदत्त ग्रहण करतो, अशाप्रकारे चिंतन करून साधकाने परिमित अवग्रहाची याचना रेली पाहिजे.१९
तसे पाहिले तर साधू अपरिग्रही असतात. परंतु जोपर्यंत आत्मा आणि शरीराचा संबंध आहे तोपर्यंत शरीरासाठी अनिवार्य रूपात आवश्यक वस्तूंचा त्यांना संग्रह करावा वगतो. त्यात देहरक्षण आणि लोकलज्जेच्या दृष्टीने वस्त्राची आवश्यकता राहते. परंतु आचार संहितेनुसार साधकाने परिमित म्हणजे आगमामध्ये सांगितलेले निश्चित परिमाणयुक्त बस्व जवळ बाळगले पाहिजे. जर मनात काही अधिक सुविधेचे भाव आले तर साधकाकडून
होऊ शकते. असे होता कामा नये कारण थोडी सुट अथवा थोडे पतन पुढे पुढे एषणेची आणि सुखसुविधेची भावना वाढवत जाते. म्हणून साधूने नेहमी ह्या भावनेच्या चितनामध्ये मग्न राहिले पाहिजे. असे चिंतन केल्याने साधकाची वस्त्रेषणा आणि त्याचप्रमाणे इतर एषणा कमी होतात.
२) अनुज्ञापित पान भोजन - याचा अर्थ असा आहे की, गुरुजनांच्या आज्ञेनुसार आहारपाणी घेणे. असे करणारा निर्ग्रन्थ असतो.२०
आहारपाणी हे शरीरासाठी आवश्यक आहे. त्या संबंधी आगमामध्ये विस्तृत आहे. त्याच्यासाठी जे नियम निर्धारित केलेले आहेत त्यांची मर्यादा किती आहे