________________
(१३२)
आहे. त्याचे पालन तर साधू करतातच पण ते करत असतानाही त्याने लची आहारपाणी घेण्यासाठी आज्ञा घेतली पाहिजे म्हणजे दोष लागण्याची याच प्रकारची शक्यता राहत नाही. ह्या भावनेच्या चिंतनाने साधू नियंत्रित, व्यवस्थित मर्यादित राहू शकेल. म्हणून शास्त्रानुसार शुद्ध भिक्षाग्रहण केली पाहिजे.
माहाची अवधारणा - निर्गन्थ साधकाने क्षेत्र आणि काळाच्या प्रमाणाने मानाची याचना केली पाहिजे.२१
ह्या भावनेमध्ये साधूला स्थान आणि काळाच्या मर्यादेत राहून अवग्रह अनुग्रहाचा मज केला आहे. साधूने आवश्यक पदार्थ घेताना मनात निश्चय केला पाहिजे की अमुक प्रशान व अमुक काळाच्या मर्यादत घेईन. अशा प्रकारे मर्यादा घातल्याने मनाची वृत्ती नियंत्रित राहते. स्थान आणि वेळेचे जीवनामध्ये अत्यंत महत्त्व आहे. क्षणोक्षणी जागृत पाहिल्याने एषणा वाढत नाही आणि तन व मन यांची वृत्ती नियंत्रित राहते. जीवन पदार्थ अथवा वस्तूसाठी नाही. पदार्थ अथवा वस्तू जीवनासाठी आहे. म्हणून जीवनाचा पदार्थाचरोवर एवढाच संबंध राहिला पाहिजे, ज्यामुळे आत्मा गौण होता कामा नये. ह्या भावनेच्या चिंतनाने साधू अवग्रहात्मक एषणेपासून मुक्त राहतो.
१) अभिक्ष्ण अवग्रह याचना - साधूने एकदा अवग्रहाची आज्ञा घेतल्यानंतर पुन्हा पुन्हा अवग्रह अनुज्ञा ग्रहण केली पाहिजे. असे केल्याने साधकाला अदत्तदानाचा दोष लागत नाही.२२
दुसऱ्या भावनेमध्येही अवग्रह ग्रहण करण्याविषयी उल्लेख आहे की, साधूने गुरुजनांची आज्ञा घेऊन अवग्रह स्वीकार करावा. त्यालाच अधिक दृढ करण्याचा आशय या भावनेबरोबर जोडलेला आहे. साधूने अनेकवेळा आज्ञा घ्यावी आणि तसाच त्याचा प्रयत्नसुद्धा असावा कारण त्यामुळे साधकाकडून व्रतामध्ये चूक होण्याची आशंका राहत नाही. यासाठी या भावनेचे पुन्हा पुन्हा चिंतन आवश्यक आहे. या भावनेला जर गुरुजनांच्या आजचा भाव जोडलेला असेल तर त्याच्याकडून शास्त्रमर्यादेचे उल्लंघन होत नाही.
१) साधार्मिकाकडून अवग्रह याचना - जो साधक साधार्मिकाकडे अर्थात स्थत सारखेच आचरण करणाऱ्या साधूंकडे विचारपूर्वक मर्यादित अवग्रहाची याचना करतो तो निर्ग्रन्थ आहे.२३
अदत्तदान महाव्रताचे निर्विघ्नपणे परिपालन व्हावे, यासाठी अन्य आवश्यक क्रियेबरोबर परिमित आणि सीमित अवग्रहाचा - अपेक्षित वस्तूचा