________________
(४४)
आहे.
आगमामध्ये वर्णित विषय - जैन आगम साहित्यात जैन श्रमणाचे आचार विचार, व्रत-संयम, तप-त्याग गमन-आगमन, उपवास, प्रायश्चित्त, जीवाजीव इत्यादी नवतत्त्व, कर्म, पुनर्जन्म, आत्मा संसार, मोक्ष इ. विषयाचे वर्णन आहे तसेच लोककथा. धर्मोपदेशाची पद्धती, तत्कालिन राजे-महाराजे इत्यादींचे विवेचन प्राप्त होते.
तीर्थंकरांचा जन्म, दीक्षा इ. पंचकल्याणात्मक त्यांची कठोर साधना, संतजीवन त्यांचे मूळ उपदेश, त्यांची विहारचर्या, शिष्यपरंपरा, आगार धर्म, अनगार धर्म, आर्यक्षेत्राची सीमा, अन्य तार्किक व त्यांची मतमतांतरे इत्यादी संबंध माहिती प्राप्त
FANARTbibalibusiness
होते.
_ वास्तुशास्त्र, ज्योतिषविद्या, भूगोल-खगोल, संगीत, नाट्य, वेगवेगळ्या कला, प्राणीविज्ञान, वनस्पतीविज्ञान इ. अनेक विषयांचे आगमात विस्तृत विश्लेषण केलेले आहे. ह्या सर्व विषयांच्या अध्ययनाने तत्कालिन सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजनैतिक परिस्थितीवर प्रकाश पडतो.
शिक्षणक्षेत्रात अध्यापक आणि विद्यार्थी, विनित-अविनित शिष्य, विद्यार्थी जीवन, लिपी, रितीरिवाज, धार्मिकव्यवस्था, लौकिक देवीदेवता इत्यादींचे वर्णन सुद्धा केलेले आहे.
शेतकरी, गाडीवान, मजूर, व्यापारी, राजा, राजकीय अधिकारी इत्यादींचा सुद्धा प्रसंगानुसार उल्लेख प्राप्त होतो. ह्यावरून हजारो वर्षांपूर्वीच्या भारतीय समाज आणि प्राचीन इतिहास समजण्यासाठी आगम फारच महत्त्वपूर्ण आहेत.
१८. जैन आगमसाहित्याचे दोन विभाग जैन आगमसाहित्याचे दोन भाग केले जाऊ शकतात. १) महावीरांच्या पूर्वीचे साहित्य २) महावीरांच्या नंतरचे साहित्य
महावीरांच्या पूर्वीचे साहित्य आज उपलब्ध नाही परंतु त्याचे प्रमाण प्राप्त हात. कारण महावीरांच्या पूर्वीसुद्धा तीर्थंकर झाले आहेत आणि त्यांच्या विचारांनी सुद्धा आपण जाणतो. महावीरांच्या पूर्वी साहित्य निर्माण झाले म्हणूनच तर 'पूर्व' या नावाने संबोधित झाले आणि त्याचा समावेश 'दृष्टिवाद' नावाच्या बाराव्या अंगसूत्रात झाला. पूर्व चौदा होते.३०