________________
बनते. अशाप्रकारे संसाराच्या स्वभावाचा विचार करणे ।
गच्या स्वभावाचा विचार करणे, 'संसार भावना' आहे. अशा भावनेचे हा चिंतन केल्याने मनुष्य संसाराच्या भयाने उद्विग्न होतो. आणि संसारातून विरक्त
होल्पाचा प्रयत्न करतो.
जीवाबरोबर कर्माचा संबंध अनादी काळापासून आहे. पण ते सांत आहे, अनंत माली हा अपेक्षेने व्यक्तिगत दृष्टीने जीवाच्या संसाराचा अंत होतो. जो जीव तप, संयम अनि साधनेद्वारे कर्म क्षीण करतो. अर्थात आत्म्याबरोबर संलग्न सर्व कर्म नष्ट करतो, लेव्हा तो मुक्त होतो. तो संसरणातून, अवागमनातून, जीवन आणि मृत्यूतून मुक्त होतो. त्राचा संसार कायमचा नष्ट होतो.
वैयक्तिक दृष्टीने प्राण्याच्या संसाराचा अंत होतो. परंतु प्रवाहरूपात जो संसार भारत आहे ते कधीच नष्ट होत नाही. कारण संसारातील सर्व जीव मुक्त होणे संभवत नाही. ह्या प्रवाहाच्या दृष्टीने संसार चालत राहिल पण साधकाच्या आत्म्याने हे चिंतन अवश्य केले पाहिजे की मला ह्या चतुर्गतीरूप संसारातून मुक्त व्हायचे आहे. त्या दिशेने प्रयत्न करायला पाहिजे. ह्या दार्शनिक पृष्ठभूमीवर संसारभावना उपस्थित आहे.
संसाराच्या सत्यस्वरूपाला समजून ते ग्राह्य आहे की परिहेय ह्याचे चिंतन केले
तसे पाहिले तर मानवाच्या मोहाचे बंध इतके घट्ट आहेत की त्याला हर्ष-शोक, मुख-दुःखाच्या कोणत्याही परिस्थितीत संपूर्णपणे वैराग्य येत नाही. परंतु निरंतर अभ्यास त्याने याच्यातून सुटका होऊ शकते. संसाराच्या सत्य स्वरूपाचे ज्ञान होण्यासाठी त्याचे उन्हा पुन्हा चिंतन, मनन केले तर जीवनाची दिशा बदलते. भौतिकवादीचे जीवन अध्यात्मवादाकडे वळते. आणि तो आत्मसाधनेचा मार्ग स्वीकार करतो. ज्यांनी संसार सागर पार केला आहे. त्यांचे जीवन उपादेय म्हणजे आचरण्यायोग्य आहे आणि जो ससाराच्या दुःखाने ग्रस्त आहे त्यांचे जीवन 'हेय म्हणजे त्याज्य' आहे असे चिंतन केले पाहिजे. सम्यक् व्रत, नियम, ध्यान इत्यादी अनेक उपाय करून, मोहांचा त्याग करून
सुज्ञानमय स्वरूपाचे ध्यान केल्याने संसार परिभ्रमणाचा नाश होतो आणि मोक्षपदाची प्राप्ती होते.
एकत्व भावना
ति मनुष्य एकटाच येतो आणि ज्यांना जीवनात आपले मानतो शेवटी
या सर्वांना सोडून एकटाच परलोकात निघून जातो. ह्या जगात माझे काणा