________________
(९८)
से संभवणार ? ते सर्व 'पर' आहेत. अशाप्रकारे 'पर' वस्तूपासून स्वतःला भिन्न जन आपल्या स्वरूपात स्थिर होणे, अविनाशी आत्म्याबरोबर एकत्वाचा अनुभव करणे ही एकत्व अनुप्रेक्षा आहे.
माप्रकारे चिंतन केल्याने स्वजनांबरोबर प्रेम आणि परजनांबरोबर द्वेषाचा बंध होत नाही. साधक वैराग्यभावनेला प्राप्त होतो आणि मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्नशील बनतो.
कांतात राहून एकत्वभावनेद्वारे धर्माची आराधना, उपासना करणे हेच एकत्व भावनेचे सक्ष्य आहे. परंतु एकत्व भावनेच्या चिंतनाने पूर्णपणे फळाची प्राप्ती होत नाही. अन्यत्व भावना
एकत्व भावनेमध्ये मी एकटाच आहे असे चिंतन केले जाते. अन्यत्व भावनेमध्ये आल्याशिवाय दुसरे सगळे 'पर' आहेत, 'अन्य' आहेत असे चिंतन केले जाते. 'मी एकटा आहे' हे विधिरूप व्याख्यान आहे आणि 'देह इत्यादी पदार्थ माझ्यापासून वेगळे आहेत', है माझे नाही' इत्यादी निषेधरूप वर्णन आहे. अशाप्रकारे ह्या दोन्ही भावनांमध्ये विधी निषेधल्प फरक आहे.
एकत्व भावनेमध्ये आत्मनिरीक्षण आहे आणि अन्यत्व भावनेमध्ये बाह्य जगाचे स्पष्ट परीक्षण आहे. एकत्व भावनेमध्ये 'मी कोण ? आणि माझे काय ? इत्यादी आत्मस्वरूपाचे चिंतन होते तेव्हा अन्यत्वभावनेमध्ये मी काय नाही आणि माझे काही नाही याचे भेदज्ञान होते.
बहिरात्मभाव तोडण्यासाठी अन्यत्व भावनेचे चिंतन केले पाहिजे. अन्यत्व भावना भदज्ञानाची गुरुकिल्ली आहे. ही आध्यात्मिक विकासाची पहिली पायरी आहे. अन्यत्व भावना ही जीवात्म्याला अन्य पदार्थांची आसक्ती सोडून अंतरात्मभावात स्थिर करते आणि परमात्मभावापर्यंत पोहचवते.
। संसारात मुख्यत्वे संबंधांच्या दृष्टीने पदार्थांना दोन भागात विभाजित केले जाते. एक स्व' आणि दुसरा 'अन्य'. 'स्व' म्हणजे आत्मा. आत्म्याला सोडून दुसरे जे काही
आहे ते सर्व 'अन्य' आहे.
जैन दर्शनामध्ये अनंत आत्मे आहेत असे मानतात. प्रत्येक शरीरात वेगळा वेगळा आत्मा आहे. संसारी आत्मा सशरीरी आहे. आत्म्याला शरीर कर्मामुळे प्राप्त होते. जेथे ९ आहे तेथे शरीरासाठी सुखकारक, अपेक्षित आणि आवश्यक पदार्थ सुद्धा आहेत.
घटान पाहिले तर आत्मा आणि अन्य पदार्थ एकदम वेगवेगळे आहेत.