________________
मैत्री भावना
प्रेमभाव, मित्रभाव, शुभचिंतन, सख्यता, सद्भावना, सहयोग, हितैषिता इत्यादी मैत्रीचे समानार्थक शब्द आहेत.७०
हा जीव अनंत काळापासून चतुर्गतिमय संसारामध्ये परिभ्रमण करत आहे. ह्याने का योनीमध्ये अनेक वेळा जन्ममरण केले आहे, त्यामुळे संसारात जितके प्राणी आहेत या सर्वाच्या बरोबर कोणत्या ना कोणत्या रूपात त्याचे संबंध जुळलेले आहेत. सर्वांनी
यावर उपकार केले आहेत म्हणून सर्व ह्याचे कुटुंबी आणि उपकारी आहेत. ह्या जगात कोणीही परके नाही. अशाप्रकारे विचार केल्याने जगात जितके जीव आहेत ते आपले संबंधी असो अथवा नसो मग ते मनुष्य असो अथवा पशुपक्षी अथवा नारक आणि देव आयो इतकेच काय त्रस अथवा स्थावर जीव असेल तरी सर्वांप्रती माझा मैत्री भाव आहे. कोणीच माझा शत्रू नाही, कोणाच्या बरोबर माझे वैर नाही, सर्व प्राणी माझ्या आत्म्यासारखे आहेत, जसे मला सुख प्रिय आणि दुःख अप्रिय आहे तसेच त्या जीवांना सुद्धा सुख प्रिय आणि दुःख अप्रिय आहे.७१ अशाप्रकारे चिंतन करणे 'मैत्री भावना' आहे.
"मैत्री परेषां हितचिन्तनं यद'७२ दुसऱ्यांच्या हिताची चिंता करणे दुसऱ्यांसाठी मंगलकामना करणे ही मैत्री आहे. जीव आपल्या स्वजनांसंबंधी आणि परिचित लोकांच्या हिताचे चिंतन तर करतोच परंतु प्रत्युपकाराची आशा ठेवल्याशिवाय सर्वच प्राण्यांच्या हिताचे चिंतन करणे 'मैत्रीभावना'
आहे.
- आचार्य हेमचंद्रांनी मैत्री भावनेचे महत्त्व दाखवताना सांगितले आहे की, कोणीच पाप करू नये. कोणताच जीव दुःखी होऊ नये, सर्व जीव मुक्त व्हावे, सुखाचा अनुभव करावा अशाप्रकारची बुद्धी ठेवणे मैत्री भावना आहे.७३ आपल्यामुळे दुसऱ्यांना दुःख होऊ नये अशी इच्छा ठेवणे ही सुद्धा मैत्री भावना आहे.
चार भावनांमध्ये मैत्रीचे स्थान प्रथम आहे. कारण अन्य तीन भावनांचा मैत्री भावनेमध्ये समावेश होतो. जसे प्रमोद अर्थात गुणीजनांच्या प्रती मैत्री बहुमानयुक्त चित्त, कष्णा अर्थात दीन हीन जीवांच्या प्रती दयाभावरूपी मैत्री, अनुकंपायुक्त चित्त, आणि माध्यस्थ अर्थात निर्गुणी आणि दोषयुक्त अविनीत जीवांच्या प्रती मैत्री उपेक्षायुक्त चित्त, अशाप्रकारे मैत्री भावना अत्यंत व्यापक आहे.
वनचा झरा ज्यांच्या हृदयात वाहत राहतो. त्यांचे परस्पर वैर. शोक