________________
(११७)
RAHARASHHOTE
व्य भावना ही समता धर्माची द्योतक आहे, जेथे राग, द्वेष आहे तेथे आणि उदासीनतेने अथवा माध्यस्थ्यतेने दुःख आणि क्लेशाचा नाश होतो. बनाच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचा सर्वश्रेष्ठ उपाय माध्यस्थ भावना
लेश आहेत आणि उदासीनतेने अथवा याबहारिक जीवनाच्या सर्व समस्यांचे निराकरण कर
पापी जीवांना पाप करू नका असे कितीही वेळा सांगितले तरी ते पाप करत असतील तर त्यावेळी त्यांच्याबद्दल माध्यस्थ्य भाव ठेवला पाहिजे. चित्ताला क्रोधादी
कलंकित करू नये. पापी माणसांचाही तिरस्कार करू नये कारण पापी व्यक्तीचा तिरस्कार केल्याने तो आपला द्वेषी बनतो आणि जसे म्हटलेच आहे - “वेरं वरेण वठ्ठई' अर्थात वैराने वैर वाढते. परंतु माध्यस्थ्य राहिल्याने आपल्याबद्दल त्यांच्या हृदयात सद्भाव टिकन राहतो आणि त्यामुळे भविष्यात त्याला सुधारण्याची संधी आपल्या हातात राहते.
सात व्यसनांमध्ये आसक्त राहणारा, अठरा प्रकारच्या पापांचे सेवन करणारा, कर कर्मे करणारा, देव, गुरू, धर्म यांच्या निमित्ताने हिंसा करणारा, हिंसेमध्ये धर्म मानणारा, कदेव, कुगुरू, कुधर्माची प्रतिष्ठा वाढविणारा, दुसऱ्यांची निंदा आणि स्वतःची प्रशंसा करण्यात मग्न राहणारा, जीवांना पाहून राग, द्वेष न ठेवता माध्यस्थ्य भाव ठेवला पाहिजे.७८
___पापी लोकांना पाहून असा विचार केला पाहिजे की अरे पहा, ह्या विचाऱ्या जीवांची कशी विषम कर्मगती आहे. चतुर्गतीरूप अशा या संसारात परिभ्रमण करता करता अत्यंत कष्ट सहन करता करता अनंत पुण्याच्या योगाने, अनंत कष्टाने मुक्ती देणारा मनुष्य जन्म इत्यादी उत्तम साधन सामग्री मिळाली असतानाही हा अज्ञानतेने व्यर्थ ती सामग्री नष्ट करीत आहे. सुखाच्या इच्छेने दुःखाचे उपार्जन करीत आहे, दगड खरेदी करण्यासाठी चिंतामणी रत्न देत आहे सुधारण्याऐवजी बिघडत आहे. हे प्रभू ! ह्या अज्ञानी जीवांची कुकर्माचे फळ भोगताना काय अवस्था होईल ? हे प्रायश्चित्त कसे करतील ? परंतु ह्या मूढ जीवांचा काय दोष ? अज्ञान आणि अशुभ कर्मामुळे ह्यांना सदबुद्धीची प्राप्ती झाली नाही. जसे भवितव्य असेल तसाच संयोग त्यांना प्राप्त होईल. अशा प्रकारच्या विचाराने त्यांच्याबद्दल राग, द्वेष न करता माध्यस्थ्य भावनेने त्यांची उपेक्षा करणे म्हणजेच माध्यस्थ्य भावना आहे.
माध्यस्थ्य भावना ढालीसारखी आहे, ती आपल्या आत्म्याचे रक्षण करते. दुर्भाव आणि राग, द्वेषाच्या प्रसंगी समभाव ठेवल्याने फायदाच होतो कर्मबंध होत नाही.
ह्या मैत्री इत्यादी चार भावना आत्म्याच्या शुद्ध स्वरूपाशी संयुक्त आहेत.