________________
RSS
CAREE
(१०८)
आहे. त्या दुर्लभ गोष्टीला सुलभ करण्यासाठी आणि बोधी सम्यक्त्वाची प्राप्ती करण्यासाठी पुरुषार्थ साध्य केला पाहिजे.
प्रथम तीर्थकार भगवान ऋषभदेव यांनी जेव्हा दीक्षा घेतली तेव्हा भरताला त्यगादीवर बसवून बाहुबली आणि अन्य अठ्यांण्णव पुत्रांना राज्याचे भाग दिले. नंतर मात महाराजांच्या राज्यात चक्ररत्न उत्पन्न झाले ते घेऊन ते सर्व देशांवर विजय संपादन
यासाठी निघाले. विजय प्राप्त करून पुन्हा आले तेव्हा आपल्या बांधवांना स्वत:च्या आरेमध्ये राहण्याचे सांगितले. तेव्हा त्या सर्वांनी भगवान ऋषभदेवांच्या जवळ जाऊन सागितले की, हे प्रभू ! भरत जरी आमचा मोठा भाऊ असला तरी तुम्ही दिलेले आमचे राज्य तो आमच्याकडून पुन्हा का घेत आहे ? आणि त्यांच्या आज्ञेत आम्ही का राहावे? आम्हीसुद्धा तुमचेच पुत्र आहोत. आम्हालाही स्वतःचा काही स्वाभिमान आहे. तेव्हा भगवान पदेवांनी त्यांना उपदेश दिला - 'संबुज्डाह किं न बुज्झह'- अरे भव्य जीवांनो, समजा, बोध प्राप्त करा. ही बोधी फक्त मानवी जीवनातच होणे शक्य आहे. जगाचे राजपाट, मानसन्मान, सत्ता, पदवी आणि प्रतिष्ठा सर्वकाही अस्थिर आहे, नाशवंत आहे, लक्ष्मी चंचत आहे. सर्वकाही सोडून शेवटी आयुष्य पूर्ण झाल्यावर जावेच लागेल अथवा पुण्य भीम झाले तर सत्ता, संपत्ती, कुटुंब तुमच्या देखत नष्ट होतील. खरी लक्ष्मी तर आन्मगुणांची आहे, आणि खरे साम्राज्य मोक्षाचे आहे, आंतरिक. शबूंवर विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करा, पुरुषार्थ साध्य करा, हेच खरे राज्य आहे. तेथे तुमच्या अखंड सुखात भाग घेण्यासाठी कोणताच भरत येणार नाही म्हणून देवांनाही दुर्लभ अशा या मनुष्य जन्मात वैराग्य भावना जागवून बोधी प्राप्त करा.
ऋषभदेव भगवंताच्या उपदेश ऐकून अट्याण्णव भावांचे हृदय परिवर्तित झाले, आणि त्यांचे अंतकरण वैराग्यभावनेने भरून गेले. तेथेच संसाराचा त्याग करून ते सर्वजण
पमा अणगार' झाले. बोधीला सुलभ बनवून आराधनेमध्ये लीन झाले. तप, संयमाद्वारे आत्म्याला उज्ज्वल बनवून सर्व कर्मांचा क्षय करून परम पदाला प्राप्त झाले.५२
अशाप्रकारे बोधिदुर्लभ भावनेमध्ये रममाण होणाऱ्या साधकाची 'पर' द्रव्यातून भासयता नष्ट होते, अज्ञान दर होते व हृदयात ज्ञानदीप प्रकाशित होऊ लागता.
धर्मभावना
शेवटची अथवा बारावी भावना आहे. ह्या अ'
धर्मस्वाख्यात भावना अथवा धर्मभावना आचार्य श्री उमास्वातीच्या अनुसार ही
बारावा भावना आहे. ह्या अगोदर अकरा भावनांमध्ये जे प्रतिपादन केलेले